अल्पवयीन मुला-मुलींना मोबाईलने बिघडविले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 06:20 PM2023-12-29T18:20:20+5:302023-12-29T18:21:11+5:30

समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो.

Minor boys and girls spoiled by mobile | अल्पवयीन मुला-मुलींना मोबाईलने बिघडविले!

अल्पवयीन मुला-मुलींना मोबाईलने बिघडविले!

निखिल म्हात्रे, अलिबाग - सध्या फ्री-फायर, लुडो, पब्जी या खेळाने यंगिस्थानला चांगलेच गुंतवून ठेवलं आहे. त्यामुळे खेळांच्या दुष्परिणामांविषयी जन जागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत प्रयत्न सुरू असताना या खेळाच्या ऑनलाइन स्पर्धांना उधाण आले आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पीढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली आहे.

सध्याची युवा वर्गाचा आवाडता गेम म्हणजे प्लेयर्स अननोन बॅटल ग्राऊंड अर्थात पब्जी हा ऑनलाइन खेळ पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे त्यातून दिसून येत आहे. रोज रात्री 10 ते 2 या वेळेत अनेक यूटयूब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत पब्जीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज साधारण 40 ते 50 हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेत स्थळांच्या माध्यमातून 20 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंतची रक्कम टीप देतात.

समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो. पब्जी खेळाचा अतिवापर केल्यास तरुणांच्या मानसिकेतवर परिणाम होऊन नैराश्य येऊ शकते. पालकांनी योग्य काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अर्चना सिंह यांनी सांगितले.
 
मोबाईलचे दुष्परिणाम - 

अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी, लुडो गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाइल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो तसेच पब्जी बाबतही होते, असे मी सातत्याने माझ्या यूटयूब वाहिनीवर सांगत असताना पब्जी स्टार दिसून येतात. मात्र ते आपण कितपत मनावर घ्यायचं हे स्वत: ठरविलं पाहीजे. स्पर्धेसाठी ऑनलाइन वॉर रूम तयार करण्यात येते. स्पर्धा ती तीन ते चार तास चालते. शेवटी ऑनलाइन जिवंत राहणार्‍या स्पर्धकाला पाच हजारांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळते असे सोशल मीडियावर सांगण्यात येते.
  
ही घ्या काळजी - 

सतत मोबाईल स्क्रीन बघितल्यामुळे लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो. विशेषत: डोळ्यांचे दोष निर्माण होतात. 
- डोळ्यातून पाणी येणे, डोके दुखणे, डोळे सुजणे असे प्रकार समोर येत आहेत. याचे परिणाम भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे. 
- स्क्रीनच्या प्रकाशामुळे, किरणांमुळे केवळ डोळ्यावर परिणाम होतो असे नाही तर जीवनाच्या इतर चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होण्याची शक्यता असते.

ही घ्या उदाहरणं - 
- ऑनलाईन अभ्यासाच्या नावाने लहान मुले तासन्‌ता‌स मोबाईल बघतात. 
अंधारामध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. 
- सतत स्क्रीन बघितल्यामुळे डोकेदुखीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांची झोपही बरोबर होत नाही. त्यांच्या एकूणच हालचालीवर परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
आताची युवा पिढी ही मोबाईलच्या व्यसनाधीन होत चाललेली आहे. जिथे पाहावे तिथे ही मुलं व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, पब्जी खेळताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे. याची विविध उदाहरणं देत सोशल नेटवर्क किती घातक आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच पालकांनी स्वत:सह आपल्यामुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवणं अत्यावश्क आहे.
- डॉ. अचर्ना सिंह, मानसोपचार तज्ज्ञ.

Web Title: Minor boys and girls spoiled by mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग