माथेरान : पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी अजूनही प्रवासी सेवेपासून दूर आहे. ब्रिटिश काळातील शिरस्ता पाळून पावसाळी सुटीनंतर नॅरोगेजवर येईल अशी शक्यता होती. मात्र रेल्वे बोर्डाची मानसिकता लक्षात घेता नेरळ-माथेरान मिनीट्रेन अजूनही बंद राहणार आहे. मिनीट्रेनसाठी माथेरानकर आक्र मक झाले असून येत्या १ नोव्हेंबर रोजी नेरळ येथे रेल रोकोसाठी सज्ज होत आहेत.९ मे २०१६ रोजी किरकोळ अपघातांमुळे बंद करण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन आजही प्रवासी सेवेपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटनावर होणारा परिणाम लक्षात घेता मिनीट्रेन लवकर नॅरोगेज रु ळावर येणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासन मिनीट्रेनसंबंधी सर्व कामे पूर्ण करून ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या पावसाळी सुटीनंतर मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती. नॅरोगेज ट्रॅकची दुरु स्ती आणि मिनीट्रेनची इंजिने यांची उपलब्धता लक्षात घेता प्रवासी वाहतूक नेरळ-माथेरान आणि अमन लॉज-माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु पावसाळी सुटी संपत आली तरी नेरळ-माथेरान दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत कोणतीही तयारी रेल्वे प्रशासनाकडून दिसून येत नाही. ही स्थिती अशीच राहिली तर प्रवासी वाहतूक सुरू होण्याबाबत आणखी वाट पाहावी लागेल आणि मागील दीड वर्षाप्रमाणे आणखी किती महिने वाट पाहावी लागेल याची कोणतीही शाश्वती नाही.हे लक्षात घेऊन आता माथेरानकरांनी आरपारची लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मिनीट्रेन बंद असल्याचे सोयरसुतक रेल्वे प्रशासनाला नाही, त्याचा कोणताही फटका बसताना दिसत नाही. म्हणून नेरळ येथे येऊन मुंबई-पुणे ही मध्य रेल्वेची मेन लाइन काही काळासाठी बंद करण्यासाठी आता माथेरानकरांनी आंदोलन जाहीर केले आहे. १नोव्हेंबर रोजी माथेरानकर नेरळ येथे शेकडोच्या संख्येने रेल रोको आंदोलन करणार आहेत. त्यासाठी माथेरानमधील राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन पक्षांनी पुढाकार घेतला असून रेल रोकोचे नियोजन सुरू केले आहे. माथेरानकरांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी तयारी या दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.मिनीट्रेन आणि माथेरान हे नाते आहे. मिनीट्रेनमधून प्रवास करता येईल म्हणून पर्यटक माथेरानला येत असतात. मात्र मागील दीड वर्षापासून मिनीट्रेन बंद असल्याचे सर्र्वांना कळून चुकले आहे, त्यामुळे अर्धे माथेरान वीकेंड देखील रिकामे असते.- मनोज खेडकर, अध्यक्ष, काँग्रेस, माथेरानमाथेरान हे गाव पर्यटनावर अवलंबून असून मागील दीड वर्षे मिनीट्रेन बंद असल्याने पर्यटनावर पूर्ण अवकळा आली आहे. आम्ही मिनीट्रेन सुरू व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले आहेत, मात्र यश येत नाही. पण आता मुंबई लाइनचा संपर्क तोडल्याने रेल्वेला आमची दाहकता कळेल.- अजय सावंत,अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस
मिनीट्रेनचा मुहूर्त पुन्हा हुकणार? माथेरानकर आक्र मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:43 AM