अतिक्र मणाच्या विळख्यात माथेरान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:31 AM2017-08-02T02:31:43+5:302017-08-02T02:31:43+5:30
माथेरान या स्थळावर मागील दशकांत लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पिढ्यान्पिढ्या येथे राहणाºया स्थानिकांनी झोपडपट्टी भागात सुरुवातीला
माथेरान : माथेरान या स्थळावर मागील दशकांत लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पिढ्यान्पिढ्या येथे राहणाºया स्थानिकांनी झोपडपट्टी भागात सुरुवातीला आपल्या लहान-मोठ्या झोपड्या बांधल्या होत्या. कालांतराने प्रत्येकाची आर्थिक सुबत्ता वाढल्यावर पक्की घरे बांधली. तसेच पर्यटकांना ऐन सुट्ट्यांच्या हंगामात खोल्या मिळत नाहीत, हॉटेल्सच्या रूमसुद्धा वेळप्रसंगी अपुºया पडतात, हे लक्षात घेऊन व्यवसायासाठी खोल्या वाढवल्या.
गावातील ठरावीक २५४ प्लॉट हे बाजार भूखंड आहेत, तर बहुतांश क्षेत्र हे वनविभागाच्या अखत्यारित येत आहे; परंतु आजवर बांधलेल्या सर्वच झोपड्यांवर नगरपालिकेने अनधिकृत शिक्का मारलेला आहे. ज्याने-त्याने मनाला वाटेल त्याप्रमाणे बांधकामे केलेली आहेत. बांधकामे करताना सुरु वातीस संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांनी सूचित केले होते. लोकप्रतिनिधींना ही बाब धोकादायक असल्याचे समजले होते; परंतु स्थानिकांच्या हट्टापुढे त्या वेळेस त्यांचासुद्धा नाईलाज होता. शेवटी याच पसाºयामुळे, तसेच काहींनी तर गल्ल्याबोळांवर सुद्धा अतिक्र मण केल्यामुळे हरित लवादाने एकूण ७००पेक्षा अधिक बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, त्यामुळे आता सर्वांची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच गावातील काही मंडळींनी गावाच्या विरोधात कट कारस्थाने रचून पर्यावरणवाद्यांना येथील बांधकामांची इत्थंभूत माहिती दिली आहे. त्यामुळे हा कारवाईचा फास अधिक बळकट केला जात आहे.
पूर्वी ठरावीक स्थानिक मंडळी झोपड्या बांधून वापर केवळ निवासी रहिवासासाठी करीत होते; परंतु माथेरान नगरीवर स्थानिकांनी हळूहळू अतिक्र मण केले आणि मिळेल तसे बांधकाम करून संपूर्ण परिसर बकाल के ला. काही भागांत तर पावसाचे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही, यामुळे पावसाळी पाणी घरांत शिरून मुंबई सारखीच परिस्थिती पाहावयास मिळते. अनेकांनी लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने बांधकामे केलेली असली, तरीसुद्धा नियोजनाचा अभाव असल्यामुळे भविष्यात बिकट परिस्थिती होवू शकते.