आमदार जयंत पाटील यांच्याकडून पत्रकारास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:54 IST2019-05-23T16:37:49+5:302019-05-23T16:54:19+5:30
निवडणूक मतमोजणी प्रक्रिये दरम्यान अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली.

आमदार जयंत पाटील यांच्याकडून पत्रकारास मारहाण
आविष्कार देसाई/अलिबाग
अलिबाग - निवडणूक मतमोजणी प्रक्रिये दरम्यान अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली.
अलिबाग येथे रायगड लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत नाही तोवर मतदान केंद्राबाहेर आमदार जयंत पाटील यांनी प्रथम पोलिसांसोबत हुज्जत घातली. कशाळकर हे आपले वृत्तांकनाचे काम करून आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते, त्या दरम्यान मतमोजणी केंद्रात आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मतमोजणी केंद्रावर आले.
आमदार जयंत पाटील हे कशाळकर यांना म्हणाले तुम्ही पत्रकार काहीही बातम्या छापता तर चांगल्या बातम्या पण छापा आम्ही आता निवडून आलो असे संभाषण करीत थेट कशाळकर यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या कानशिलात वाजवली. तर आमदार पंडित पाटील व बलमा यांनी कशाळकर यांच्या कॉलरला हात घालत धक्काबुक्की केली. हा घडलेला प्रकार अलिबागचे डी वाय एस पी दत्तात्रेय निघोट यांच्यासमोर हा सारा प्रकार घडूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पत्रकारांसहित सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.