आमदार राजन साळवी यांचे पीए चौकशीला हजर, रायगड लाच लुचपत विभागाची मालप यांना नोटीस
By राजेश भोस्तेकर | Published: February 3, 2023 11:45 AM2023-02-03T11:45:05+5:302023-02-03T11:45:21+5:30
ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे.
अलिबाग :
ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशी बाबत रायगड लाच लुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश नोटीस द्वारे मालप यांना देण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. नोटिस २ फेब्रुवारीला मिळाल्याने मालप उपस्थित राहू शकले नव्हते. शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी सुभाष मालप हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर झाले. यावेळी त्याच्या सोबत आमदार राजन साळवी हे सुध्दा आले असले तरी मालप हे एकटेच चौकशीला सामोरे गेले आहेत.
स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड लाच लुचपत विभागाने आमदार राजन साळवी आणि त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ते बाबत चौकशी सुरु केली आहे. २० जानेवारी रोजी आमदार साळवी यांची सहा तास अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात चौकशी झाली होती. यावेळी साळवी यांनी चौकशीला सहकार्य केले असून काही कागदपत्रांची मागणी विभागामार्फत मागितली आहे. ही माहिती दहा फेब्रुवारी आमदार साळवी यांना सादर करायची आहे. तत्पूर्वीच साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ते बाबत चौकशीला हजर राहण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस पाठवली होती.
सुभाष मालप यांना २ फेब्रुवारी रोजी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहण्याबाबत नोटिसा द्वारे कळविण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. नोटीस २ फेब्रुवारी ला मिळाल्याने ते गैरहजेर राहिले होते. आज शुक्रवारी मालप हे लाच लुचपत कार्यालयात हजर झाले आहे. लाच लुचपत विभागामार्फत त्याच्याही मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. आमदार राजन साळवी यांची आणि त्याच्या कुटुंबाची मालमत्तेची चौकशी सुरू असताना स्विय सहाय्यक सुभाष मालप हे सुध्दा चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.