अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आज सकाळी अकरा वाजता अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात हजर राहणार आहेत. १४ डिसेंबर रोजी साडे चार तास लाच लुचपत विभागाने आमदार साळवी याच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीला आमदार साळवी सामोरे जाऊन माहिती दिलेली आहे.
२० जानेवारी रोजी मालमत्तेची विचारलेली माहिती अर्जासोबत भरून ती सादर करणार असल्याचे साळवी यांनी म्हटले होते. त्यानुसार आज शुक्रवारी २० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात हजर राहणार आहेत.