अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आज अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात कागदपत्र घेऊन हजर राहणार आहेत. २० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी याची सहा तास लाच लुचपत कार्यालयात अधिकारी यांनी चौकशी केली होती. साळवी यांच्या मालमत्ते बाबत काही कागदपत्र सादर करण्यात विभागाने सगितली होती. त्यानुसार साळवी हे आज बुधवार २२ फेब्रुवारी रोजी १२ वाजता उपस्थित राहणार आहेत.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते बाबत रायगड लाच लुचपत विभागाने चौकशीची नोटीस डिसेंबर महिन्यात पाठवली होती. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी लाच लुचपत कार्यालयात येऊन चौकशीला हजर झाले होते. त्यानंतर २० जानेवारी रोजी मालमत्तेची कागदपत्र घेऊन हजर झाले होते. यावेळी त्याच्या विषयी, तसेच कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. आमदार साळवी यांनी सादर केलेली कागदपत्रे याचे समाधान न झाल्याने इतर कागदपत्रे सादर करण्यास लाच लुचपत विभागाने सागितले होते. त्यानुसार १० फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सागितले होते.
दरम्यान आमदार राजन साळवी याच्या स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांचीही मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आलेली आहे. आज बुधवारी दुपारी बारा वाजता आमदार साळवी हे अलिबाग कार्यालयात हजर राहून कागदपत्र सादर करणार आहेत. त्यामुळे त्यांनतर तरी विभागाचे समाधान होणार की आमदार साळवी याच्या अडचणी वाढणार हे चौकशी नंतर समोर येणार आहे.