नांदगाव/ मुरुड : मुरु ड नगरपरिषदेचा २०१८-१९साठी ११ कोटी ५८ लाख २०४ रुपयांच्या अर्थसंकल्पाला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्या सहमतीने मंजुरी देण्यात आली आहे. या वेळच्या अर्थसंकल्पात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही वाढ केलेली नाही. घरपट्टीमधून मुरु ड नगरपरिषदेला ८० लाख तर पाणीपट्टीतून ४१ लाखांचे उत्पन्न मिळत आहे; परंतु २०१८-१९ ला चार वर्षे पूर्ण झाल्याने शासनाच्या जीएस प्रणालीनुसार जागेची मोजदाद होणार असून, ज्यांनी वाढीव क्षेत्राचे काम केले आहे त्यांच्या घरपट्टीत वाढ होणार हे निश्चित असल्याचे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले. अर्थसंकल्पाची विशेष माहिती देण्यासाठी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या दालनात एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील बोलत होत्या.या पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाविषयी माहिती देताना नगराध्यक्षा स्नेहा पाटील म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेऊन नागरिकांचे हित व आर्थिक उत्पन्नाची सांगड घालून सर्वांच्या मतानुसार मंजूर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पासाठी विरोधी नगरसेवकांच्या सूचनासुद्धा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. सर्व आवश्यक बाबींवर मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली असून, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प देऊन जनतेला प्राधान्य दिले असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प मंजुरीसाठी नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या वेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते. सुधारित २०१७-१८ अर्थसंकल्पासाठी १० कोटी ३५ लाख २७,२५० ची मंजुरी होती. याच वर्षाची शिलकी रक्कम ३ कोटी ९० लाख १६,९४७ एवढी आहे. प्रस्तावित २०१८-१९ चा अंदाजित खर्च ११ कोटी ५८ लाख २०४ आहे. २०१८-१९ च्या या अंदाजपत्रकात प्रशासनाकरिता वेतन, प्रवासभत्ता, निवृत्तिवेतन, सेवानिवृत्ती या बाबींवर विशेष रकमेची तरतूद करण्यात आली आहे. रस्ता अनुदान, १४ वा वित्त आयोग, खासदार निधी, आमदार निधी, पर्यटन निधी आदींसाठी तरतूद केल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.या वेळी उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, महिला व बालकल्याण सभापती मुग्धा जोशी, पांडुरंग आरेकर, युगा ठाकूर, मुख्याधिकारी दयानंद गोरे, वरिष्ठ लेखापाल किरण शहा आदी मान्यवर उपस्थित होते.मुरूडमधील अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव निधीया वेळी पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुरु ड व लक्ष्मीखार स्मशानभूमी सुशोभीकरण, मोºया, गणेश आळी रस्ता, जुनी पेठ या अंतर्गत रस्त्यांसाठी निधी राखीव ठेवला आहे.शीघ्रे ते तेलवडे पाइपलाइन बदलणे, गणेश आळी, दरबाररोड, पोलीस ठाणे, शेगवाडा या भागात पाण्याच्या टाक्या बांधणार असून, या भागाला एप्रिल व मे महिन्यात मुबलक पाणी देणार आहोत. सध्या जे भाजी मार्केट नगरपरिषदेसमोर आहे ते नवीन जागेत स्थलांतर करणार असून नगर परिषदेसमोरील जागेत नाना-नानी पार्क बनवणार असल्याची माहिती या वेळी भायदे यांनी दिली. मुरु ड नगरपरिषदेकडे दोन कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण निधी असून, यामधूनसुद्धा भरपूर विकासकामे करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला.मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी शासनाकडून ज्या वेळी निधी प्राप्त होत असतो त्या वेळी ठरावीक रक्कम म्हणजेच हिस्सा हा बाजूला काढला जातो. यासाठी या रकमेची या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली असल्याचे सांगितले. विरोधी व सत्ताधारी नगरसेवक यांनी शांततेत अर्थसंकल्पास मंजुरी दिल्याबद्दल नगरसेवक पांडुरंग आरेकर यांनी आभार मानले.
मुरु ड न.प.चा ११ कोटी ५८ लाखांचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:42 AM