पोलादपूरमध्ये मनसेचे आंदोलन सुरू; पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्तीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:45 AM2019-12-10T00:45:32+5:302019-12-10T00:45:57+5:30
पोलादपूर नगरपंचायत झाली असली तरी नगरपंचायतचा कारभार मुख्याधिकाºया विना असून नसल्या सारखा झाला आहे.
पोलादपूर : पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिलेल्या इशाºयानुसार मनसेतर्फे पोलादपूर नगरपंचायत कार्यालयसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
पोलादपूर नगरपंचायत झाली असली तरी नगरपंचायतचा कारभार मुख्याधिकाºया विना असून नसल्या सारखा झाला आहे. चार वषापासून पोलादपूरचा कारभार कधी पोलादपूरचे अल्प काळासाठी उपलब्ध असणाºया मुख्याधिकाºयां मार्फत तर कधी अतिरिक्त कारभार पाहणाºया महाड, माणगाव, म्हसळाच्या मुख्याधिकाºयांकडे सोपविण्यात येत असल्याने पोलादपूरमधील कामकाज थंडावले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलादपूर मनसे तर्फे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांना अलिबाग येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते .
या निवेदन द्वारे पोलादपूर नगरपंचायत स्थापन झाल्या पासून नगरपंचायतसाठी पूर्ण वेळ प्रशासकीय प्रमुख पद असलेले मुख्याधिकारी पद हे रिक्त राहिले होते. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नितीन गाढवे हे कारभार सांभाळत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते रजेवर गेले आहेत. पोलादपूर नगरपंचायतचा कारभार महाड नगरपरिषदचे मुख्याधिकारी हे प्रभारी कामकाज म्हणून पहात आहेत.
विविध कामकाजासाठी येणाºया जनतेला दाखल्यांसह विविध कागदपत्रांसाठी पोलादपूर नगरपंचायतमध्ये ताटकळत बसावे लागते आहे. तसेच नगरपंचायतीच्या कारभारावर देखील काही प्रश्नचिन्ह निवेदनात व्यक्त करण्यात आले आहेत. या सर्व घटकांची चौकशी करण्यासाठी प्रशासकीय प्रमुख असलेले मुख्याधिकारी हे पद तातडीने नियुक्त होणे गरजेचे असल्याचे निवेदनद्वारे सूचित करण्यात आले होते .
या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय यंत्रणेने न घेतल्याने मनसेने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.