राज ठाकरेंचे आदेश येताच मुंबई-गोवा महामार्गावर खळ्ळखट्याक; माणगावात कंपनीचे कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:00 AM2023-08-17T06:00:03+5:302023-08-17T06:00:38+5:30

खुर्च्या आणि फर्निचर सामानाची मोडतोड केली आहे.

mns chaos on mumbai goa highway office of the company was broken into in mangaon | राज ठाकरेंचे आदेश येताच मुंबई-गोवा महामार्गावर खळ्ळखट्याक; माणगावात कंपनीचे कार्यालय फोडले

राज ठाकरेंचे आदेश येताच मुंबई-गोवा महामार्गावर खळ्ळखट्याक; माणगावात कंपनीचे कार्यालय फोडले

googlenewsNext

माणगाव : राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये निर्धार मेळाव्यात मुंबई - गोवा महामार्गाचे वास्तव मांडत कामाला लागा, असे संकेत दिल्यानंतर त्याचे पडसाद रायगडमध्ये उमटले. माणगावमध्ये मनसैनिकांनी इंदापूर ते लाखपाले या टप्प्यातील महामार्गाचे काम करणाऱ्या चेतक इंटरप्रायजेसअंतर्गत सनी कन्स्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय फोडले. खुर्च्या आणि फर्निचर सामानाची मोडतोड केली आहे.

मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार सेना अध्यक्ष संजय गायकवाड, चिमण सुखदरे या कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेत हे कृत्य केले.  बुधवारी दुपारी मनसे पदाधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक सुरू होती. यावेळी इंदापूर ते लाखपाले टप्प्यातील कूर्मगतीने सुरू असलेले काम, रखडलेला माणगाव बायपास व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीबाबत जाब विचारण्यात आला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत त्यांनी कंपनी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमधील खुर्च्या, फर्निचर आणि सामानाची मोडतोड केली. या तोडफोडीबाबत विचारले असता, मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गुन्हे दाखल करा

माणगाव येथील कार्यालय तोडफोड प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. त्यांनी रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

Web Title: mns chaos on mumbai goa highway office of the company was broken into in mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.