कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या तिसऱ्या वार्षिक सहकार परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कर्जत येथे येत आहेत. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी असे हे शिबिर होत आहे. मनसेच्या सहकार विभागाचे दाेनशे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे.राज ठाकरे यांच्या संवादाने सहकार परिषदेचे उद्घाटन होणार आहेत. त्यानंतर ‘वित्तीय सहकारी संस्था’ या परिसंवादामध्ये महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचे मार्गदर्शन होणार आहे; तर सहकारी सेवा संस्था यांची नोंदणीपासून या संस्था कशा चालवाव्यात, या विषयावर मुंबई सहकार बोर्डाचे अध्यक्ष सुरेश म्हसे यांचे मार्गदर्शन होणार आहे. पक्षबांधणी कौशल्य या विषयावर तसेच पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांचेदेखील मार्गदर्शन आणि ‘सहकार सेलचे पक्षबांधणीमधील योगदान’ या विषयावरही विचार मंथन होणार आहे.सहकार परिषदेचा समारोप माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर, पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, आमदार प्रमोद पाटील, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, जयप्रकाश बाविस्कर, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले आहे.
मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 8:03 AM