आज अमित ठाकरेंनी घेतली शिंदे गटातील महेंद्र थोरवेंची भेट; रायगड जिल्ह्यात चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:06 PM2022-07-11T16:06:43+5:302022-07-11T16:07:24+5:30
आज अमित ठाकरे यांनी कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली.
रायगड- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे 'मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान' राबवत असून ते सध्या रायगड दौऱ्यावर आहेत. आज अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली.
मनसे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितजी ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला रायगडमध्येही जोरदार प्रतिसाद लाभला.शनिवारी दिवसभरात महाड,माणगाव,रोहा,तळा,दिवेआगर येथे पक्ष तसंच मनविसे पदाधिकाऱ्यांशी श्री.अमितजी ठाकरे यांनी संवाद साधला. pic.twitter.com/rqouP4Za8W
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 10, 2022
मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान दौऱ्यावर असलेले अमित राज ठाकरे यांची कर्जत बैठक ठिकाणी भेट घेतली, अमित ठाकरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटं सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली, असल्याची माहिती समोर येत आहे.
कर्जत- आज अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. pic.twitter.com/sgzyBqLx2r
— Lokmat (@lokmat) July 11, 2022
दरम्यान, अमित ठाकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यात झालेल्या या भेटीने रायगडमधील राजकीय वर्तुळात चर्चा होत असून यामुळे पुढील काळात रायगड जिल्ह्यात नवीन समीकरणे होण्याची चिन्हे मानले जात आहे. शिंदे गटाचे आमदार आणि अमित ठाकरे यांच्या या भेटीने कर्जत खोपोलीमधील शिवसेनेच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे.