शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढविणार- बाळा नांदगावकर; सहकार शिबिराचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 1:25 PM

नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेलाही दिले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत: सध्या जे पळवापळवीचे राजकारण सुरू आहे, त्याला जनता कंटाळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असल्याचा विश्वास देत आता मनसे लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व जागा लढविणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे सहकार शिबिराच्या समारोपात सांगितले. मनसेच्या दोनदिवसीय सहकार शिबिराचा समारोप नांदगावकर, सरचिटणीस रिटा गुप्ता, ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे, सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान सेलचे अध्यक्ष संतोष नागरगोजे, सहकार सेलचे पदाधिकारी सरचिटणीस विजय जाधव, अनिता माझगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, महिला उपाध्यक्ष प्रियांका शृंगारे यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, तुम्ही सहकारी संस्था काढल्या आणि घोटाळे केले. शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे डोक्याला हात लावून बसावे लागले, ही तुमची स्थिती असल्याचे सांगितले. सहकार म्हणजे सत्तेकडे जाण्याचे गणित आहे, हे सांगत तोडा फोडा आणि राज्य करा हे धोरण अंगीकारून सहकार क्षेत्रात प्रवेश करीत महाराष्ट्र काबीज करायचा आहे, असे आवाहन अनिल शिदोरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे. पी. पाटील, कर्जत अध्यक्ष महेंद्र निगुडकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसे