नांदगाव/ मुरूड : मुरुड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दैनंदिन कामे करताना लोकांना अडचण येत आहे. मुरूड, गारंबी परिसरात धरण भरल्याने बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे भातपिकास कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण कृषी खात्यामार्फत देण्यात आले आहे.मुरु ड तालुक्यात ३९०० हेक्टर जमिनीत भातपिकाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. आता पडणारा पाऊस शेतीसाठी आवश्यक होता. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सर्व पाणी जमिनीत मुरले होते. आता तो पुन्हा सुरु झाल्याने भातपिकास कोणताही धोका नसल्याचे कृषी खात्यामार्फत सांगण्यात आले आहे. कोसळणारा पाऊस हा सौम्य प्रकारचा असल्याने तयार झालेल्या भातपिकास धोका नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. हाच पाऊस जोरदार पडणारा असता तर मात्र भातपिकास धोका निर्माण होऊ शकला असता. रिमझिम पडणाऱ्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.गेल्या दोन दिवसात मुरु ड तालुक्यात ७५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. जून ते सप्टेंबरचा एकूण पाऊस हा ४४०८ मिलीमीटर एवढा पडल्याने धरणे, नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या वर्षी केवळ२२०० मिलीमीटर एवढाच पाऊस झाला होता.
मुरुड तालुक्यात मध्यम पाऊस
By admin | Published: October 05, 2016 3:00 AM