रघुजीराजे आंग्रे यांची सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 02:04 PM2018-03-30T14:04:04+5:302018-03-30T14:04:04+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग मधील घेरीया या निवासस्थानी आले आहेत.
- जयंत धुळप
अलिबाग- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या अलिबाग मधील घेरीया या निवासस्थानी आले आहेत. ही अत्यंत खाजगी व कौटुंबिक स्वरुपाची भेट असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी लोकमत शी बोलताना सांगीतले. दरम्यान या भेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली.
सरसंघचालक मोहन भागवत सकाळी मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथून विशेष बोटीने निघून मांडवा जेट्टी येथे दाखल झाले. तेथून मोटारीने ते थेट रघूजीराजे आंग्रे यांच्या घेरीया या निवासस्थानि दाखल झाले. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुपारी साडेचार वाजता सरसंघचालक मोहन भागवत हे रघुजीराजे आंग्रे यांच्या समवेत अलिबाग येथून निघून महाड मुक्कामी पोहोचणार आहेत. दरम्यान शनिवारी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ,पुणे व स्थानिक उत्सव समिती,महाड यांच्या वतीने किल्ले रायगडावर आयाेजित छत्रपती शिवाजी महाराज मानवंदना व श्री शिवपूण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहाणार असल्याचे या रायगड सोहळा समितीचे उपाध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे.