सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:04 AM2017-07-27T01:04:25+5:302017-07-27T01:04:30+5:30
पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी प्रकरणातील आरोपी माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांनी शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यां
श्रीवर्धन : पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी प्रकरणातील आरोपी माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांनी शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यां विरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्र ार दाखल केली आहे.
सुकुमार तोंडलेकर, जनार्दन गोवारी, नारायण गोलन, सागर करदेकर, मंगेश पोलेकर, बाबूराव चोरगे, प्रथमेश बारे, चॅलेंद्र पोलेकर, नंदकुमार भाटकर यांनी घरात घुसून प्रशांत शिंदे यांना जनार्दन गोवारी यांनी शिवीगाळ क रून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच वरील सर्वांनी प्रशांत शिंदे यांना मारहाण केली. या वेळी पूजा यांनी प्रशांत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता जनार्दन गोवारी व सुकुमार तोंडलेकर यांनी धक्काबुक्की करून विनयभंग केला, तसेच मुलींना सुद्धा शिवीगाळ केली असल्याची तक्रार पूजा शिंदे यांनी के ली आहे.या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत. श्रीवर्धनमधील राजकीय तणावामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने एसआरपी जवानांची टीम सज्ज करण्यात आली आहे.
प्रशांत शिंदे यांना अटक व जामीन
श्रीवर्धन पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी केल्याप्रकरणी श्रीवर्धनमध्ये तणावाचे वातावरण असताना सायंकाळी उशिरापर्यंत संतप्त शिवसैनिकांचा जमाव श्रीवर्धन शिवाजी चौक परिसरात जमलेला होता.
आरोपीला हजर करा असा आक्र ोश शिवसैनिक करत होते. मात्र, कालांतराने शिवसैनिक घरी गेल्यानंतर रात्री उशिराने माजी सभापती प्रशांत शिंदे यांना पोलिसांनी अटक केली व बुधवारी दुपारी श्रीवर्धन न्यायालयात हजर केले. न्यायालयात त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.श्रीवर्धनमधील तणावामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, खोटे गुन्हे दाखल करणाºयांची योग्य चौकशी करून पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा.
- बाबूराव चोरगे, उपसभापती
माझी जामिनावर सुटका झाली आहे, तरीदेखील मी सांगतो, मी विद्यमान सभापतींना शिवीगाळ किंवा धक्काबुक्की केलेलीच नाही. त्या माझ्या मुलीप्रमाणे आहेत.
- प्रशांत शिंदे,
माजी सभापती