महाडच्या आंबेडकर कॉलेजमध्ये महिलेचा विनयभंग; प्राचार्यासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 09:09 AM2020-10-22T09:09:29+5:302020-10-22T09:10:56+5:30
महाविद्यालयात काम करणारी ३३ वर्षीय महिला कर्मचारी १९ ऑक्टोबरला दुपारी सव्वादोन वाजता प्राचार्य डॉ. सुरेश आठवले त्यांच्या निवासस्थानी पगाराबाबत, तसेच आपल्याला शिक्षण विभागात सामावून घेण्याबाबत गेली असता प्राचार्यांनी असभ्य भाषा वापरली.
महाड : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे हे महाविद्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
महाविद्यालयात काम करणारी ३३ वर्षीय महिला कर्मचारी १९ ऑक्टोबरला दुपारी सव्वादोन वाजता प्राचार्य डॉ. सुरेश आठवले त्यांच्या निवासस्थानी पगाराबाबत, तसेच आपल्याला शिक्षण विभागात सामावून घेण्याबाबत गेली असता प्राचार्यांनी असभ्य भाषा वापरली. पैसे नसल्याने त्यामुळे पगार देणार नाही, असे सांगत शिवीगाळही केली. यावेळी माणिक आळसे व प्रतिक साळवी हे अर्वाच्य शिवीगाळ करीत या महिलेच्या अंगावर धावून गेले. एकाने तिच्या खांद्याला पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार प्राचार्य आठवले, माणिक आळसे व प्रतिक साळवीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.