म्हसळा : नळ पाणीपुरवठा योजना (पाभरे डॅम) म्हसळाकरांसाठी २००८-९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी मंजूर केली होती. ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे योजना सतत बंद पडत असे, निकृष्ट व वेळकाढूपणामुळे तब्बल २-३ वेळा ठेकेदार बदलण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे एकाच योजनेचे भूमिपूजनही दोन वेळा (ग्रामपंचायत व नगरपंचायत) झाले, परंतु म्हसळा नगरपंचायतीला नळ योजनेच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता, पण तो मुहूर्त आता सापडला आहे. नव्यानेच काही दिवसांपूर्वी योजनेचे काम सुरू झाले आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुमारे १ कोटी ४० लाख रुपये किमतीची म्हसळा नगरपंचायतीतील दुर्गवाडी, चिराठी, सावर, आदिवासी वाडी हा परिसर सोडून उर्वरित भागासाठी ही योजना होणार आहे. योजनेत ६ इंचाची ५२०० मीटर लाइन पाभरे ते म्हसळा येथे येणार आहे. ती सुमारे १ कोटीची आहे. सब मर्सिबल पंप व पंपहाउस २.९० लाख, बेलदारवाडीसाठी स्वतंत्र साठवण टाकी ३.२७ लाख, शहरांर्तगत सुमारे ७०० मीटर वितरण व्यवस्था रु. ४.४३ लाख, फिल्टरेशन प्लँट दुरुस्ती, वारेकोंड व नवेनगर येथील पाण्याचे टाकींच्या दुरुस्त्या, अशा अनेक कामांची सदर योजनेत तरतूद आहे.या योजनेच्या माध्यमातून पाभरे डॅममथून ३० एचपीच्या सबमर्सिबल पंपाने लिफ्टने पाणी म्हसळा (आदिवासी वाडी) येथील साठवण टाकीत आणणे (रोज सुमारे ४ते ५ लक्ष लीटर) आणि संपूर्ण म्हसळा शहरांत एकाच दाबाने व सर्वत्र समप्रमाणात ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे म्हसळा शहरांतील कन्याशाळा परिसर, विद्यानगरी, ब्राह्मण आळी, सानेआळी, साळीवाडा, तांबट आळी, सोनार आळी, नवेनगर, तहसील-पोलीस कार्यालय, दिघी नाका, ग्रामीण रुग्णालय, तहसील निवासस्थान, पंचायत समिती कार्यालय, कुंभारवाडा, बेलदार वाडी, इदगाह अशा बहुतांश परिसरांत योग्य दाबाने व मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासन म्हणते. तब्बल ११ वर्षांनी सुरुवात होणाऱ्या या योजनेकडे नगरपंचायत प्रशासन, पाणी संघर्ष समिती व स्थानिक जनतेने विशेष लक्ष देणे भविष्यासाठी योग्य ठरणार आहे.म्हसळा नळ पाणीपुरवठा योजना ही २००८-९ला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर झाली. आता जुनीच योजना नव्याने नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. म्हसळा शहराचा होणारा विस्तार, पर्यटकांची गर्दी, त्या दृष्टीने होणाºया या योजनेला निधी अपुरा पडेल, हे निश्चित. पर्यायाने कामे निकृष्ट होतील व पुन्हा पाणीटंचाई असे भविष्यांत होईल. -रफीक चणेकर, माजी सरपंच ग्रामपंचायत म्हसळाम्हसळा पाणी योजनेची शहरांतील संपूर्ण वितरण व्यवस्था (व्हॉल्व्हसह) व फिल्टरेशन प्लँट ही गेली २५ वर्षे म्हणजे सुरुवातीपासून सदोष (वितरण व्यवस्था) व बंद (फिल्टरेशन प्लँट)आहे. ती दुरुस्त न करता पूर्णपणे नवीन होणे आवश्यक आहे.सचिन करडे, संस्थापक, गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान व सचिव पाणी संघर्ष समितीही योजना जुनी आहे. त्याचे निकषाप्रमाणे काम होईल. अडचणी न आल्यास गणपतीपर्यंत म्हसळा शहरातील साठवण टाकीत पाणी येईल.युवराज गांगुर्डे, उपअभियंताग्रा.पा.पु.विभाग श्रीवर्धन-म्हसळा.
म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला ११ वर्षांनी सापडला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 12:46 AM