शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या  पुनर्वसनाला सापडला मुहूर्त; आठवडाभरात सरकारकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 12:09 AM

आठवडाभरात सरकारकडून पाहणी: अकरा वर्षांनी न्याय मिळणार

दत्ता म्हात्रेपेण : तब्बल ११ वर्षांनंतर बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन हाेणाऱ्या जागेचा पाहणी दाैरा नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हाेणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी, मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या ठिकाणी आजपर्यंत झालेल्या कामाचा पाहणी दौरा नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात हाेणार असल्याचे बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.

‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने दखल घेत बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बाधितांच्या पुनर्वसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश महसूल अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. २०२० साली कोरोना महामारीच्या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता नवीन वर्षात बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर प्रकल्पबाधितांनी समाधान व्यक्त केले.

जमिनीला योग्य मोबदला, प्रकल्पगस्तांचे पुनर्वसन यासाठी रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली होती. शेवटच्या आंदोलनात मुंबई-गोवा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या, मात्र बाळगंगा प्रकल्पग्रस्तांची जिद्द काही कमी झाली नाही.

रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २०१९ वर्षी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी, कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन बाळगंगा धरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली होती. त्याचबरोबरीने वाशिवली, वरसई व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी करून या ठिकाणी प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व नागरी सोयीसुविधांबाबत चर्चा झाली होती. जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी बाळगंगा पुनर्वसनासाठी विशेष लक्ष केंद्रित केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRaigadरायगड