अलिबागमध्ये नि:शुल्क दाखल्यांसाठी रुग्णांकडून घेतले जाताहेत पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:16 PM2020-02-11T23:16:49+5:302020-02-11T23:16:52+5:30
जिल्हा रु ग्णालयातील प्रकार : वरिष्ठांकडे तक्रार करूनही कारवाई नाही
निखिल म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात रु ग्णांसाठी विविध प्रकारचे २० दाखले देण्यात येतात. हे दाखले नि:शुल्क असूनही पैसे उकळण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतची तक्रार जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होऊनही अद्याप अर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
वयाचा दाखला, मूक-कर्णबधीर, मानसिक रुग्ण, गतिमंद, अस्थीव्यंग, अंध, अशा प्रकारचे जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी २० प्रकारचे दाखले दिले जातात. या दाखल्यांसाठी बुधवारी रुग्णांची गर्दी झालेली असते. एका रुग्णाला एक दाखला मिळविण्यासाठी चार वेळा फे ºया माराव्या लागत आहेत. हे रुग्ण जिल्ह्यातील वाडीवस्तीवरून येणारे असतात. त्यांना एका दाखल्यासाठी सतत अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सारख्या फेºया मारणेआर्थिकदृष्ट्या न परवडणारे असते.
दाखला मिळण्यासाठी तेथील संबंधित कर्मचाºयांना पैसे दिल्यास ते तत्काळ दाखला करून देतात. त्याबरोबरच एखादा रुग्ण हा कमी प्रमाणात अपंग असेल तर डॉक्टरची नजरआड करून त्यास ८० ते ९० टक्के अपंग असल्याचा दाखला देतात. त्यामुळे खरा अपंग असलेल्या रुग्णाला आपला हक्काचा दाखला मिळण्यासाठी मात्र जिल्हा रुग्णालयाच्या दरबारी सतत फेºया माराव्या लागत आहेत, त्यामुळे रुग्णाबरोबर त्याच्या नातेवाइकांना दाखला कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
रुग्णांना देण्यात येणारे व्याधींचे वा दिव्यांगांचे प्रमाणपत्र देताना हे कर्मचारी त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. यासंदर्भात या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे संबंधितांची तक्रारही केली होती. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय दाखल्यांमध्ये अशा कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण सुरू नाही, तसे प्रकार जिल्हा रुग्णालयात निदर्शनास आले अथवा तशा लेखी तक्रारी आल्या तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कुठल्या कर्मचाºयांनी लाच मागितल्यास त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
- डॉ. अर्चना सिंह, वैद्यकीय अधिकारी, बाह्य संपर्क