सनियंत्रण समिती ई-रिक्षासाठी अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 04:06 AM2017-10-30T04:06:14+5:302017-10-30T04:06:39+5:30

इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरातील अमानवीय हातरिक्षांना आता लवकरच आळा बसणार आहे. माथेरान ई-रिक्षा परवानगी प्रकरणी सनियंत्रण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला

Monitoring committee optimized for e-rickshaw | सनियंत्रण समिती ई-रिक्षासाठी अनुकूल

सनियंत्रण समिती ई-रिक्षासाठी अनुकूल

Next

महेश चेमटे
मुंबई : इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरातील अमानवीय हातरिक्षांना आता लवकरच आळा बसणार आहे. माथेरान ई-रिक्षा परवानगी प्रकरणी सनियंत्रण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अहवालात माथेरानमधील भौगोलिक स्थिती मांडण्यात आली असून, ई-रिक्षासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुमारे १०० वर्षांपासून अमानवी पद्धतीने हातरिक्षाचा माथेरानमध्ये वाहतुकीसाठी वापर होतो. प्रवासी वाहतुकीसह जीवनावश्यक वस्तंूच्या वाहतुकीसाठीही हातरिक्षाचा वापर करतात. परिणामी, या अमानवीय प्रथेपासून सुटका मिळावी म्हणून ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
त्यानुसार राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने केंद्र शासनास पाठविलेल्या प्रस्तावानुसार सनियंत्रण समिती पुनर्गठित करण्यात आली. संबंधित शाखेने २३ मार्च २०१७ रोजी रायगडचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सनियंत्रण समितीचा अहवाल मागितला होता. समितीचा अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अहवालात माथेरान ई-रिक्षा प्रकरणी अनुकूलता दर्शविण्यात आली आहे.
परिवहन विभागाच्या पनवेल येथील अधिकाºयांनी माथेरान ई-रिक्षा प्रकरणी सकारात्मक अहवाल सरकारकडे सादर केला आहे. यात वाहनबंदी कायद्यात केंद्राने योग्य ते बदल केल्यानंतर राज्य शासनाकडून योग्य त्या परवानग्या घेत ई-रिक्षा सुरू करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या सनियंत्रण समितीचा अभिप्राय घेण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याशी मार्च महिन्यात पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला असून, केंद्रातर्फे परवानगीसाठी केवळ औपचारिकता शिल्लक आहे. त्यामुळे पर्यावरण सचिव यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे लवकरात लवकर माथेरान ई-रिक्षा प्रकरणी अहवाल सादर करावा, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

दूध, मिनरल वॉटर.... ५ रूपये
गॅस सिलिंडर........... १००- १५० रूपये

Web Title: Monitoring committee optimized for e-rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.