कर्जतमध्ये माकडाने घातला धुमाकूळ

By admin | Published: June 30, 2017 02:53 AM2017-06-30T02:53:42+5:302017-06-30T02:53:42+5:30

शहरात तीन-चार दिवसांपासून एक माकड फिरताना दिसत होते. या माकडाने डेक्कन जिमखाना येथील एका घराच्या गच्चीवर दोन दिवस मुक्काम ठोकला.

Monkey-tossed carcasses in Karjat | कर्जतमध्ये माकडाने घातला धुमाकूळ

कर्जतमध्ये माकडाने घातला धुमाकूळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : शहरात तीन-चार दिवसांपासून एक माकड फिरताना दिसत होते. या माकडाने डेक्कन जिमखाना येथील एका घराच्या गच्चीवर दोन दिवस मुक्काम ठोकला. मात्र, या दोन दिवसांत त्याने गच्चीवर हैदोस घातला. काही केल्याने माकड जाईना अखेर दोन दिवसांनंतर माकडास पळविण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
डेक्कन जिमखाना परिसरात महेंद्र कर्वे यांच्या घराच्या गच्चीवर या माकडाने दोन दिवस मुक्काम ठोकला होता. गच्चीवरील ठेवलेले सामान हे माकड अस्ताव्यस्त टाकत होते. त्याचा सारखा आवाज होत असल्याने कर्वे कुटुंबीय त्रासले होते. कर्वे कुटुंबीयांनी माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, माकड जे हुसकावण्यास जाईल त्याच्या अंगावर जात असे, यामुळे कर्वे यांनी संध्याकाळी ७च्या दरम्यान वनविभाग (पश्चिम)चे वनपरिक्षेत्र अधिकारी लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रात्री ८च्या सुमारास वनरक्षक वंदना बडे आणि पी.पी. शिंदे यांना कर्वे यांच्या निवासस्थानी पाठवले. वनरक्षकांनी घराच्या गच्चीची पाहणी केली. तर माकड एका कोपऱ्यात झोपलेले आढळले. त्यांनी माकडाला हुसकण्याचा प्रयत्न केला. माकड बाहेर जात नव्हते, उलट ते या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात होते. अखेर कंटाळून कर्मचारी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी वनपाल संजय तांबे व वनरक्षक के. जी. मांडे प्राणिमित्र नंदकुमार दांडेकर हे कर्वे यांच्या निवासस्थानी आले. वनपाल तांबे यांनी फटाक्याचा आवाज करून त्या माकडाला पळवून लावले.

Web Title: Monkey-tossed carcasses in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.