महाड, पोलादपूरमध्ये मान्सूनपूर्व पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 02:53 AM2018-06-02T02:53:01+5:302018-06-02T02:53:01+5:30
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या रहिवाशांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला.
पोलादपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या रहिवाशांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. मात्र पहिल्याच पावसात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागला.
वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी परिसरात हजेरी लावली. पाऊस व वादळी वाºयामुळे महावितरण बत्ती सातत्याने गुल होत होती.७ जून रोजी खºया अर्थाने पावसाचे आगमन होत असले तरी गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे पावसाचे आगमन लांबल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहेत. सायंकाळपासून पोलादपूर तालुक्यातील वाकण, कोंढवी, पोलादपूर या भागात वादळी पावसात वीज गेल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला.
पोलादपूरसह महाड तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. मान्सूनपूर्व कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत तर काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवातही झालेली नाही. वादळी वाºयामुळे वीज वाहिन्या लोंबकळल्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
कर्जत : मान्सूनपूर्व पावसाने कर्जत तालुक्यातील आदिवासी भागाला शुक्रवारी सायंकाळी झोडपले. पावसाने हवेत थोडा गारवा आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद अनुभव मिळाला मात्र पावसा पूर्वीची कामे पूर्ण न झाल्याने अनेकांची त्रेधा उडाली.
संध्याकाळी साडे पाच - सहाच्या दरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमू लागले आणि थोड्याच वेळात पावसाची सुरु वात झाली. तालुक्याच्या आदिवासी भागात म्हणजे कडाव गावाच्या पुढे अगदी कशेळे, जाम्बरु ंग भागात जोरदार पाऊस पडला. कर्जत शहरात त्याने हजेरी लावली. पावसाचा केवळ शिडकावा झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.