अलिबाग : गेल्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात २७ घरे-गोठे कोसळले आहेत, तर उरणमध्ये विजेची तार पडल्याने एका तरु णाचा मृत्यू झाला. त्याचे नाव समजू शकले नाही. मंगळवारी रात्रभर पावसाने रायगड जिल्ह्यास झोडपून काढले आहे. माथेरानमध्ये सर्वाधिक ३६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मच्छीमारीकरिता अरबी समुद्रात बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी दोन बोटींशी संपर्क झाला असून, या दोन्ही बोटी आणि १६ खलाशी सुखरूप आहेत. मात्र इतर दोन बोटींचा पत्ता लागला नाही.अरबी समुद्रात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व कृष्णा महादेव कोळी यांची ‘हेरंभशिवलिंग’ या दोन बोटींशी वायरलेस यंत्रणेद्वारे संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संपर्क झाला असून, या दोन्ही बोटी मुरूड-जंजिरा समुद्रातील बॉम्बे हाय प्लॅटफॉर्मजवळ सुरक्षित आहेत. यातील एकूण १६ खलाशीदेखील सुखरूप असल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी दिली.अलिबाग तालुक्यातील रेवस मच्छीमार सोसायटीचे सदस्य किशोर श्याम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’ आणि कमलाकर कोळी यांची ‘गंगासागर’ या दोन बोटींचा पत्ता लागलेला नाही. यावर अनुक्रमे १८ व ८ असे एकूण २६ खलाशी असल्याचे नाखवा यांनी सांगितले. उद्या गुरुवारी तटरक्षक दलाच्या माध्यमातून या दोन बोटीसाठी शोध सुरू राहणार आहे.>नद्यांच्या जलपातळीत वाढसंततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे, परंतु कोणत्याही नदीची जलपातळी धोकादायक नसल्याचे जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले. बुधवारी दुपारी १ वाजता ६.५० मीटर धोकादायक जलपातळी असणाºया सावित्री नदीची प्रत्यक्ष जलपातळी ४.८० मीटर होती. धोकादायक जलपातळी २३.९५ मीटर असलेल्या कुंडलिका नदीची प्रत्यक्ष जलपातळी २२.९० मीटर होती तर धोकादायक जलपातळी ९ मीटर असणाºया अंबा नदीची प्रत्यक्ष जलपातळी ६.६० मीटर होती, अशी माहिती पाठक यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, १६ खलाशी सुखरूप; बेपत्ता दोन बोटी मुरूड समुद्रात सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:06 AM