मोरा- भाऊचा धक्का सागरी प्रवास महागला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:58 AM2021-05-26T08:58:47+5:302021-05-26T08:59:13+5:30
Mora- Bhaucha Dhakka Sea travel: मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात बुधवारपासून २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास महागणार आहे.
उरण : मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात बुधवारपासून २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास महागणार आहे.
.दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात भरमसाठ वाढ केली जाते. मागील वर्षीही तिकिट दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ७० रुपये मोजावे लागत होते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात ७० रुपयांंवरुन ९० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
ही दरवाढ २६ मेपासूनच लागु करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर निरिक्षक प्रभाकर पवार यांनी दिली.