मोरा-भाऊचा धक्का तिकिट दरात १ सप्टेंबर पासून १५ रुपयांनी कमी, प्रवासी बोटीही सुरळीत वेळापत्रक धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:27 AM2022-08-30T06:27:19+5:302022-08-30T06:27:52+5:30

Raigad News: पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामासाठी केलेली दरवाढ १ सप्टेंबरपासून मागे घेण्यात आली आहे.यामुळे तिकिट दरात १५ रुपयांनी कमी होणार आहे.

Mora-Bhau's shock Ticket price reduced by Rs 15 from September 1, passenger boats will also run on regular schedule | मोरा-भाऊचा धक्का तिकिट दरात १ सप्टेंबर पासून १५ रुपयांनी कमी, प्रवासी बोटीही सुरळीत वेळापत्रक धावणार

मोरा-भाऊचा धक्का तिकिट दरात १ सप्टेंबर पासून १५ रुपयांनी कमी, प्रवासी बोटीही सुरळीत वेळापत्रक धावणार

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण -  पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामासाठी केलेली दरवाढ १ सप्टेंबरपासून मागे घेण्यात आली आहे.यामुळे तिकिट दरात १५ रुपयांनी कमी होणार आहे.
   दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात  वाढ केली जाते.दोन वर्षांपूर्वी पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात ७५ रुपयांवरुन ९० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.तसेच २६ मे २०२२ पासून याच सागरी मार्गावरील पावसाळ्यातील जुन, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी प्रवासी वाहतूक तिकिट दरात तिकिट दरात ९० रुपयांंवरुन थेट १०५ रुपयांपर्यंत अशी १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.१ सप्टेंबर पासूनच मुंबई जलवाहतूक संस्थेने या सागरी मार्गावरील करण्यात आलेली  प्रवासी तिकिट दरवाढ कमी करण्यात येणार आहे.तसेच या सागरी मार्गावरील प्रवासी बोट सेवा उन्हाळी हंगामा प्रमाणे पुर्ववत वेळेप्रमाणे सूरू होणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली.

Web Title: Mora-Bhau's shock Ticket price reduced by Rs 15 from September 1, passenger boats will also run on regular schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड