शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मोरा मासळी मार्केटची दुरवस्था

By admin | Published: October 28, 2015 12:57 AM

उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाड्यात असणाऱ्या मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे. हे मार्केट मोडकळीस आले असून, कधीही कोसळण्याची भीती आहे

चिरनेर : उरण नगर परिषद हद्दीतील मोरा कोळीवाड्यात असणाऱ्या मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे. हे मार्केट मोडकळीस आले असून, कधीही कोसळण्याची भीती आहे. कोळीवाड्यातील मच्छीमार महिला आपला जीव धोक्यात घालून या मार्केटमध्ये मच्छी विकतात. मार्केटमध्ये सार्वजनिक शौचालय असून, या शौचालयांचे दरवाजे निखळले आहेत. या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मासळी घेण्यास ग्राहक नापसंती दर्शवतात. याचा परिणाम मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत आहे. नगर परिषदेने हे मार्केट लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास भविष्यात हे मार्केट कोसळण्याचा धोका आहे.मोरा कोळीवाडा हा उरण तालुक्यातील दुसरा मोठा कोळीवाडा आहे. हा कोळीवाडा उरण नगर परिषदेच्या अखत्यारीत असून, पालिकेच्या माध्यमातून येथे सोयी-सुविधा पुरविल्या जातात. मात्र सध्या मार्केटची दुरवस्था झाली आहे. मासेविक्रीसाठी बांधण्यात आलेले काँक्र ीटचे ओटे फुटून खड्डे पडले आहेत. छपरावरील लोखंडी पाइपना गंज लागला असून, हे पाइप तुटले असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)