पराभवाची नैतिक जबाबदारी पूर्णपणे माझी - सुरेश लाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:00 AM2019-01-29T00:00:23+5:302019-01-29T00:01:01+5:30

कर्जत नगरपरिषदेच्या पराभवानंतर पत्रकार परिषद

The moral responsibility of defeating me completely - Suresh Lad | पराभवाची नैतिक जबाबदारी पूर्णपणे माझी - सुरेश लाड

पराभवाची नैतिक जबाबदारी पूर्णपणे माझी - सुरेश लाड

Next

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाला कर्जतकर मतदारांनी नाकारले. या निवडणुकीत क ार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले, तरीही आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता असल्याने हा पराभव मी मोकळ्या मनाने स्वीकारला असून हा पराभव का झाला? याचे कारण आताच सांगू शकत नाही. मात्र हे कसे घडले? याचा शोध घेऊन पुन्हा कामाला लागू. मी सत्तेत नसतानाही जनतेची कामे करत आलो आहे आणि करत राहणार आहे. कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कर्जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस - महाराष्ट्र नवनिर्माण सेना - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष - शिवराय भीमराय विचार मंच या महाआघाडीचा शिवसेना - भारतीय जनता पक्ष - आरपीआय महायुतीने दारु ण पराभव केल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी भवनच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भगवान भोईर, जिल्हासरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव आदी उपस्थित होते.

सुरेश लाड यांनी सुरुवातीलाच शिवसेना महायुतीच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पराभूत झालेल्या महाआघाडीच्या उमेदवारांनी पुन्हा कामाला लागून नागरिक व मतदारांचा विश्वास संपादन करावा असे सांगितले. तुम्ही उमेदवारांमध्ये जास्त लाड उभे केल्याने हा पराभव झाला काय? असे पत्रकारांनी विचारले असता लाड यांनी उत्तर देताना तशी शक्यता आहे असे सावध उत्तर देऊन लगेचच कोणतेही ठोस कारण सांगता येणार नाही. आज केवळ पराभव मान्य करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे स्पष्ट केले.

मित्रपक्षांना सामावून न घेतल्याचा फटका
तुमचे आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांना या निवडणुकीत सामील न केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले काय? या प्रश्नाला उत्तर देताना मी शेवटपर्यंत आमच्या या दोन्ही मित्र पक्षांना महाआघाडीत सामावून घेण्याच्या प्रयत्नात होतो. काँग्रेसने चारही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. शेतकरी कामगार पक्षाला प्रभाग सहामधील एक जागा देण्याचे निश्चित केले होते आमचा उमेदवार शेवटच्या मुदतीपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी उपस्थित होता, परंतु त्यांच्या एका उमेदवाराने प्रभाग दोनमधील माघार घेण्यास नकार दिल्याने नाईलाजाने आम्हाला तेथे आमच्या उमेदवाराला निवडणूक लढवावी लागली.

Web Title: The moral responsibility of defeating me completely - Suresh Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.