शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

मोरबे-करंबेळी रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:06 AM

पनवेलच्या ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मोरबे ते करंबेळी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे

नवीन पनवेल : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेला मोरबे ते करंबेळी रस्ता खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालवायची कशी, असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.

पनवेलच्या ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मोरबे ते करंबेळी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे. तालुक्यातील खैरवाडी, कोंडले, येरमाळ, गारमाळ, करंबेळी, फणसवाडी, भल्याची वाडी आदी ठिकाणच्या हजारो आदिवासींना वर्षानुवर्षे या रस्त्यावरूनच पायपीट करावी लागत होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे हा पायपिटीचा वनवास संपला. मात्र, सद्यस्थितीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आदिवासींना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३ कोटींहून अधिक रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याची लांबी ७.९०५ किलोमीटर आहे. या रस्त्यामुळे ८ ते १० आदिवासी वाड्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने आदिवासी बांधव निराश झाले आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.