कंत्राटी डॉक्टरांचे ‘मानधन’ अधिक, माहिती अधिकारात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 01:04 AM2019-11-11T01:04:16+5:302019-11-11T01:04:26+5:30

रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये नियमित डॉक्टरांची भर्ती न करता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) तात्पुरती पदे भरली जात आहेत.

More 'honors' of contract doctors, information exposed | कंत्राटी डॉक्टरांचे ‘मानधन’ अधिक, माहिती अधिकारात उघड

कंत्राटी डॉक्टरांचे ‘मानधन’ अधिक, माहिती अधिकारात उघड

Next

- आविष्कार देसाई 
अलिबाग : रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये नियमित डॉक्टरांची भर्ती न करता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) तात्पुरती पदे भरली जात आहेत. नियमित डॉक्टरांना कमी वेतन आणि तात्पुरत्या स्वरूपात असणाऱ्या डॉक्टरांना बक्कळ मानधन दिले जात आहे. कंत्राटी डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीचा तपशीलच उपलब्ध नाही. असे असतानाही त्यांना पूर्ण मानधन दिले जात आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार एनआरएचएम अंतर्गत एका डॉक्टरला जास्तीत जास्त १२ लाख आणि कमीत कमी तीन लाख रुपयांचे मानधन दिले जात आहे.
येथील सरकारी रुग्णालयामध्ये काम करण्यासाठी डॉक्टर भेटत नाहीत आणि भेटलेच तर ते टिकत नाहीत. असा येथील सर्वसाधारण अनुभव आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पुरवणे सरकारची जबाबदारी आहे. आरोग्य सेवा सुरुळीत पार पडावी, यासाठी सरकारने एनआरएचएम अंतर्गत डॉक्टरांना कंत्राटी स्वरूपात सेवेत घेतले जाते. रुग्णालयाच्या नियमित अस्थापनेवर वर्ग-१ चे सिव्हिल सर्जन धरून १९ मंजूर पदे, वर्ग-२ ची ३० मंजूर पदे, गट ब चे एक पद, अशी एकूण ५० पदे आहेत. पैकी ३५ पदे भरलेली आहेत. त्यामध्ये सहा अधिकारी कायम गैरहजर असल्याचे समोर आले आहे. एनआरएचएमअंतर्गत २८ कंत्राटी पदे भरण्यात आली, म्हणजेच ५७ डॉक्टर अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत, असे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
११ कं त्राटीडॉक्टरांना
२०१७ पासून मानधन नाही
१येथील जिल्हा सामान्य रु ग्णालयात एनआरएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या ११ कंत्राटी डॉक्टरांना जून २०१७ पासून मानधन मिळत नसल्याने डॉक्टरांनी मध्यंतरी काम बंद आंदोलन सुरू केले होते.
२एनआरएचएम अंतर्गत डॉक्टरांना हजेरी बंधनकारक असताना एनआरएचएम डॉक्टरांच्या उपस्थिती बाबत बायोमेट्रिक हजेरीचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यातील काही दिवसांची गैरहजेरी असतानाही पूर्ण मानधन अदा केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सावंत यांनी सांगितले.
३त्यानुसार एनआरएचएम डॉक्टरांपैकी काही डॉक्टरना १२ लाख १६ हजार, काहींना पाच लाख ३६ हजार हजार ३५०, काहींना तीन लाख ६५ हजार, काहीना एक लाख असे मानधन असल्याचे समोर आले आहे. याउलट नियमित डॉक्टरांचे वेतन एनआरएचएम डॉक्टरांपेक्षा कमी आहे.
>सरकारचे नियमित भूलरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ असताना कंत्राटी पद्धतीवरील भूलरोगतज्ज्ञांवर महिना १२ लाख रुपये व स्त्रीरोगतज्ज्ञांवर महिना ७ लाख ३२ हजार इतका खर्च करण्यात येत आहे. नियमित असणाºया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना मात्र महिन्याला एक लाख रुपये इतके वेतन मिळत आहे. नियमित डॉक्टर वगळता एनआरएचएममधील कंत्राटी पद्धतीवरील डॉक्टरांवर होणारा करोडोंचा खर्च आता सरकारच्या लक्षात आल्याने मध्यंतरी वरिष्ठ स्तरावरून याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचेही सावंत यांचे म्हणणे आहे.
>कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या डॉक्टरांना तसेच अन्य वर्गातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे. काही डॉक्टरांना अनेक शिफ्टमध्ये काम करावे लागते, त्यामुळे ते हजेरीपुस्तक अद्ययावत नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- डॉ. नीलेश कोकरे, एनआरएचएम

Web Title: More 'honors' of contract doctors, information exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.