श्रीवर्धन आगाराच्या अधिकच्या फेऱ्या, ४ हजार किमीची केली वाहतूक; चाकरमान्यांची गैरसोय दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:14 AM2024-03-26T11:14:21+5:302024-03-26T11:14:36+5:30
श्रीवर्धन आगारातून मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, पनवेल मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.
श्रीवर्धन : शिमगा व होळी पारंपरिक सणांसाठी चाकरमान्यांना सेवा देण्यासाठी श्रीवर्धन एसटी आगाराने विक्रमी जादा वाहतूक केली आहे. श्रीवर्धन आगारातून मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा, पनवेल मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.
मुंबईस्थित चाकरमान्यांना गावी येणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून श्रीवर्धन आगाराने जवळपास ४ हजार किमीची जादा वाहतूक व १७,५०० किमीची नियमित वाहतूक केली. स्थानिकांसह, पर्यटक व भाविक यांचा जादा वाहतुकीमुळे प्रवास सुलभ झाला.
आगारातील बसेसच्या दुरुस्ती व देखभालीसाठी विशेष लक्ष दिलेले आहे. श्रीवर्धन आगारातून प्रवासीवर्गाला दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- प्रदीप विचारे, स
हायक कार्यशाळा, अधीक्षक.
श्रीवर्धन एसटी आगाराचे जादा वाहतुकीबद्दल कौतुक आहे. मात्र, बसेसच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे.
- शिवराज चाफेकर,
सामाजिक कार्यकर्ते
आगारप्रमुख मेहबूब मनेर यांनी चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांच्यात ठेवलेला समन्वय जादा वाहतुकीमध्ये प्रभावी ठरला. होळी सणासाठी पंधरा दिवस अगोदर जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवासीवर्गाने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे.
- राजेंद्र बडे, सहायक वाहतूक निरीक्षक श्रीवर्धन