मुरुड आगारातर्फे जादा गाड्या
By Admin | Published: April 15, 2016 12:54 AM2016-04-15T00:54:55+5:302016-04-15T00:54:55+5:30
एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच मुरुड या पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुरुड आगारातर्फे ८ उन्हाळी जादा बसेस सोडण्यात
मुरुड : एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच मुरुड या पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुरुड आगारातर्फे ८ उन्हाळी जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी दिली.
लांब पल्ल्यामध्ये सकाळी ५.४५ वा. मुरुड ते लातूर, ६.१५ वा. मुरुड अलिबाग पुणे मार्गे कोल्हापूर, सकाळी ११.०० वा. मुरुड ते बोरीवली, दुपारी १२.४५ मुरुड - नालासोपारा, दुपारी १.४५ मुरुड -भार्इंदर, ३.१५ वा. मुरुड ते स्वारगेट गाड्या सुरु करण्यात आल्या असून मुरुड ते पंढरपूर ही दर्शन बस लवकरच प्रस्तावित आहे.
मुंबई सेंट्रलवरून रात्री सव्वाबारा वाजता मुंबई-भालगाव मार्गे मुरुड तर रात्री पाऊण वाजता मुंबई-अलिबाग-मुरुड या जादा बसेस फेऱ्या कार्यान्वित केल्याची माहिती बोगरे यांनी दिली. तरी प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारातर्फे करण्यात आले. (वार्ताहर)