- निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड जिल्ह्यात ८ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. ९ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ६२ हजार ४१५ वर पोहोचला आहे. त्यातील १ हजार ६८९ जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पनवेल मनपामध्ये तर सर्वात कमी प्रमाण म्हसळा तालुक्यात आहे.सप्टेंबर, २०२० या एकाच महिन्यात कोरोनाने ४,१५५ रुग्ण उपचार घेत होते, तर इतक्या ४५४ लोकांचा बळी घेतला होता. श्रावण हा सणांचा महिना असल्याने या काळात सर्वाधिक प्रमाणात लोक बाहेर पडले होते. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असल्याने गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. या काळात कोरोनाचा प्रसार वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंदकोरोनाने १५ तालुक्यांमधील १,२३६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात पुरुषांचे प्रमाण ३५ टक्के, तर महिलांचे प्रमाण २० टक्के इतके आहे. दरम्यान, सप्टेंबर, २०२० या महिन्यातच कोरोना मृत्यूचा आलेख अचानक उंचावला. या एकाच महिन्यात ४५४ जणांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला. म्हसळात कोरोनाने १४ जणांचा मृत्यूतालुक्यात कोरोनाने सर्वाधिक ५४ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतलेली आहे. त्या पाठोपाठ पनवेल ग्रामीणमध्ये १४३, अलिबाग तालुक्यात १४१, खालापूर - १२५, पेण - १०९, कर्जत - १०१, माणगाव - ३७ तर म्हसळा तालुक्यात कोरोनाने केवळ १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल मनपामध्ये सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:18 AM