म्हसळ्यात कुणबी समाज सर्वाधिक

By admin | Published: February 15, 2017 04:48 AM2017-02-15T04:48:04+5:302017-02-15T04:48:04+5:30

तालुक्यात एकूण ४०,३५८ मतदार (म्हसळा शहर वगळून) त्यामध्ये २१,३५८ महिला, तर १८,९९९ पुरुष मतदार आहेत. तालुक्यात

Most of the Kunbi Samaj in Mhasla | म्हसळ्यात कुणबी समाज सर्वाधिक

म्हसळ्यात कुणबी समाज सर्वाधिक

Next

म्हसळा : तालुक्यात एकूण ४०,३५८ मतदार (म्हसळा शहर वगळून) त्यामध्ये २१,३५८ महिला, तर १८,९९९ पुरुष मतदार आहेत. तालुक्यात कुणबी समाजाचे मतदान सर्वाधिक असून, त्यानंतर आगरी व कोळी समाजाचा नंबर लागतो. सर्वच पक्षांनी कुणबी समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषदेच्या पाभरे गटात एकूण १९,०१० मतदार असून त्यामध्ये ८,९७२ पुरु ष व १०,०३८ महिला, वरवठणे गटात एकूण २१,३४८ मतदार असून १०,०२४ पुरु ष व ११,३२४ महिला मतदार आहेत. पंचायत समितीचे एकूण चार गण असून, मेंदडी गणात एकूण ९,४३३ मतदारांपैकी ४,४०९ पुरु ष व ५,०२४ महिला, पाभरे गणात एकूण ९,५७७ मतदारांपैकी ४,५६३ पुरु ष व ५,०१४ महिला, वरवठणे गणात एकूण ११,००३ मतदार असून ४,९४८ पुरु ष व ६,०५५ महिला, आंबेत गणात एकूण १०,३४५ मतदारांपैकी ५,०७६ पुरु ष व ५,२६९ महिला मतदार आहेत. पाभरे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होत असून बाकी सर्व गट व गणांत चौरंगी लढती होत आहेत.
पाभरे गटात नीशा पाटील (सेना), धनश्री पाटील (एनसीपी), मीना टिंगरे (भाजपा), वरवठणे गटात रवींद्र लाड (सेना), बबन मनवे (निकाल पेंडिंग-एनसीपी), डॉ. शेख अ. मुईज अ. अजीज (काँग्रेस), मेंदडी गणात निर्मला कांबळे (सेना), छाया म्हात्रे (एनसीपी), जीनत शकील नजीर (काँग्रेस), सुनंदा पाटील (भाजपा), पाभरे गणात हेमंत नाक्ती (सेना), संदीप चाचल (एनसीपी) महादेव पाटील (काँग्रेस), प्रकाश रायकर (भाजपा), सुधाकर येलवे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया), वरवठणे गणात अमोल पेंढारी (सेना), मधुकर गायकर (एनसीपी), महादेव पाटील (काँग्रेस), गोविंद भायदे (भाजपा) हे उमेदवार रिंगणात आहेत. (वार्ताहर)

Web Title: Most of the Kunbi Samaj in Mhasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.