नववर्ष स्वागतासाठी सर्वाधिक पर्यटक मुरुडमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 10:44 AM2021-12-27T10:44:29+5:302021-12-27T10:44:43+5:30

Murud : किनारे गजबजायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे २५ हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिल्याने व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत.

Most tourists in Murud to welcome the New Year | नववर्ष स्वागतासाठी सर्वाधिक पर्यटक मुरुडमध्ये 

नववर्ष स्वागतासाठी सर्वाधिक पर्यटक मुरुडमध्ये 

Next

आगरदांडा : पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरूड समुद्र किनारा मुंबई, पुण्यापासून जवळ असल्याने मुरूडचा समुद्र किनारा पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहेत. त्यामुळे नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी मुरूडच्या किनाऱ्यांना पसंती दिली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक इथं दाखल होत आहेत. किनारे गजबजायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे २५ हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिल्याने व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत.

पर्यटकांनी नाताळ सुटीची मज्जा करण्याकरिता दुसरा दिवशीही पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हजारो पर्यटकांनी जंजिरा किल्ल्याला भेट दिल्याने  शासनाच्या महसुलात वाढ झाली आहे. सध्या नाताळच्या सुट्या सुरू असल्याने पर्यटकांनी मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील जंजिरा किल्ला, काशिद, खोरा बंदर यांना पसंती दिली आहे. सर्वच ठिकाणी लाॅजिंग हाॅटेल फुल्ल झाले आहेत. 

Web Title: Most tourists in Murud to welcome the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड