माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य , नागरिक स्वच्छता राखण्यासाठी असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:14 AM2017-09-02T02:14:47+5:302017-09-02T02:14:52+5:30

घराची ओळख अंगण सांगते हे खºया अर्थाने माथेरानला सध्या लागू पडत असून येथील बहुतांश भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता हरपल्यामुळे घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे

 Moth empire in Matheran, unable to maintain civil cleanliness | माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य , नागरिक स्वच्छता राखण्यासाठी असमर्थ

माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य , नागरिक स्वच्छता राखण्यासाठी असमर्थ

Next

माथेरान : घराची ओळख अंगण सांगते हे खºया अर्थाने माथेरानला सध्या लागू पडत असून येथील बहुतांश भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता हरपल्यामुळे घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. यासाठी ठरावीक प्रभागातील सुज्ञ नागरिकांनी जेथे जेथे कचरा टाकला जातोय त्या जागीच पत्र्यांचे कुंपण टाकण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु वात केली आहे. ‘नगरसेवक आपल्या दारी’ ही संकल्पना राबवून खुद्द नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक प्रभागाचा दौरा करून स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांस सूचित केलेले आहे. परंतु येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती नागरिकांच्या बेपर्वाईमुळे पहावयास मिळत आहे.
माथेरान नगरपालिकेचे कर्मचारी नियमितपणे गावातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांत स्वच्छता करीत असतात, परंतु काही प्रभागातील नागरिक विशेषत: महिला या हेतूपुरस्सर रस्त्यांवर अथवा जवळपास ओला, सुका कचरा यामध्ये उष्टान्न, फळांचे टरफलं, भाजीपाला कचरा टाकत आहेत. याचा विनाकारण त्रास सततच्या रहदारी करणाºया
लोकांसह पर्यटकांना सोसावा लागत आहे.
गावातच अनेक भागात घरगुती लॉजिंग आहेत, त्यामुळे निदान लॉजिंगमध्ये राहणाºया पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर अशाच प्रकारे घाणीचे साम्राज्य असेल तर इकडे कुणीही पर्यटक फिरकणार नाहीत. पर्यटक आहेत तरच माथेरानचा व्यवसाय शाबूत आहे, रोजगाराचे साधन आहे हे ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने स्वच्छतेच्या बाबतीत आगेकुच केली पाहिजे असेही काही सुज्ञ नागरिकांचे मत आहे.
नगरपालिकेने सर्वच प्रभागात कचरा कुंडी लावलेली आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा नागरिकांना सहजपणे टाकता यावा अशीच सोय केलेली आहे. मात्र कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अनेकजण कुंडी बाहेर तर कुणी इतस्तत: पसरवीत आहेत. स्वत:हून स्वत:सह इतरांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अनेकदा नगरपालिकेस स्वच्छतेबाबत शासनाने पुरस्कार बहाल केलेले आहेत. याची जाणीव येथील नागरिकांना नसल्याने त्यांच्याच गलिच्छ वर्तणुकीबाबत
सुज्ञ नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यापासून अस्वच्छता, कचरा दृष्टीस पडत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. एक नैसर्गिक अभूतपूर्व ठेवा लाभलेले हे दुर्गम पर्यटनस्थळ यामुळेच आजवर नावारूपास येण्यास मागे पडले आहे. परंतु स्थानिक मंडळींनी तरी याबाबत पुढाकार घेऊन आपले गाव स्वच्छ ठेवल्यास पर्यटकांची संख्या वाढून सर्वांना रोजगार प्राप्त होणार आहे. बाहेरु न जे लोक घोडा अथवा अन्य व्यवसाय करण्यासाठी माथेरानला येतात त्यांना या गावाचे काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवून आपल्या गावचा विकास खुंटवण्याऐवजी आपण स्वच्छता राखून स्वच्छतेच्या बाबतीत प्रबोधन केल्याशिवाय हे गाव अस्वच्छतेपासून मुक्त होणार नाही, तेंव्हा स्थानिकांनीच यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे जाणकार मंडळींचे म्हणणे
आहे.

Web Title:  Moth empire in Matheran, unable to maintain civil cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.