शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य , नागरिक स्वच्छता राखण्यासाठी असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:14 AM

घराची ओळख अंगण सांगते हे खºया अर्थाने माथेरानला सध्या लागू पडत असून येथील बहुतांश भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता हरपल्यामुळे घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे

माथेरान : घराची ओळख अंगण सांगते हे खºया अर्थाने माथेरानला सध्या लागू पडत असून येथील बहुतांश भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता हरपल्यामुळे घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. यासाठी ठरावीक प्रभागातील सुज्ञ नागरिकांनी जेथे जेथे कचरा टाकला जातोय त्या जागीच पत्र्यांचे कुंपण टाकण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु वात केली आहे. ‘नगरसेवक आपल्या दारी’ ही संकल्पना राबवून खुद्द नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक प्रभागाचा दौरा करून स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांस सूचित केलेले आहे. परंतु येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती नागरिकांच्या बेपर्वाईमुळे पहावयास मिळत आहे.माथेरान नगरपालिकेचे कर्मचारी नियमितपणे गावातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांत स्वच्छता करीत असतात, परंतु काही प्रभागातील नागरिक विशेषत: महिला या हेतूपुरस्सर रस्त्यांवर अथवा जवळपास ओला, सुका कचरा यामध्ये उष्टान्न, फळांचे टरफलं, भाजीपाला कचरा टाकत आहेत. याचा विनाकारण त्रास सततच्या रहदारी करणाºयालोकांसह पर्यटकांना सोसावा लागत आहे.गावातच अनेक भागात घरगुती लॉजिंग आहेत, त्यामुळे निदान लॉजिंगमध्ये राहणाºया पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर अशाच प्रकारे घाणीचे साम्राज्य असेल तर इकडे कुणीही पर्यटक फिरकणार नाहीत. पर्यटक आहेत तरच माथेरानचा व्यवसाय शाबूत आहे, रोजगाराचे साधन आहे हे ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने स्वच्छतेच्या बाबतीत आगेकुच केली पाहिजे असेही काही सुज्ञ नागरिकांचे मत आहे.नगरपालिकेने सर्वच प्रभागात कचरा कुंडी लावलेली आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा नागरिकांना सहजपणे टाकता यावा अशीच सोय केलेली आहे. मात्र कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अनेकजण कुंडी बाहेर तर कुणी इतस्तत: पसरवीत आहेत. स्वत:हून स्वत:सह इतरांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अनेकदा नगरपालिकेस स्वच्छतेबाबत शासनाने पुरस्कार बहाल केलेले आहेत. याची जाणीव येथील नागरिकांना नसल्याने त्यांच्याच गलिच्छ वर्तणुकीबाबतसुज्ञ नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यापासून अस्वच्छता, कचरा दृष्टीस पडत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. एक नैसर्गिक अभूतपूर्व ठेवा लाभलेले हे दुर्गम पर्यटनस्थळ यामुळेच आजवर नावारूपास येण्यास मागे पडले आहे. परंतु स्थानिक मंडळींनी तरी याबाबत पुढाकार घेऊन आपले गाव स्वच्छ ठेवल्यास पर्यटकांची संख्या वाढून सर्वांना रोजगार प्राप्त होणार आहे. बाहेरु न जे लोक घोडा अथवा अन्य व्यवसाय करण्यासाठी माथेरानला येतात त्यांना या गावाचे काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवून आपल्या गावचा विकास खुंटवण्याऐवजी आपण स्वच्छता राखून स्वच्छतेच्या बाबतीत प्रबोधन केल्याशिवाय हे गाव अस्वच्छतेपासून मुक्त होणार नाही, तेंव्हा स्थानिकांनीच यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे जाणकार मंडळींचे म्हणणेआहे.