मुलांना विष पाजून आईची आत्महत्या
By admin | Published: February 3, 2017 02:30 AM2017-02-03T02:30:49+5:302017-02-03T02:30:49+5:30
पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील
अलिबाग : पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कीर्ती केदार गंद्रे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या दोन्ही मुलांना प्रथम अलिबागच्या सरकारी
रु ग्णालयात दाखल करण्यात आहे होते. त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम रु ग्णालयात हलविले आहे. कीर्तीचे माहेर हे खोपोली होते. लग्नानंतर ती थेरोंडा येथे आपल्या पती केदार गंद्रे आणि मुलगी आरोही (दीड वर्ष), मुलगा यश (४ वर्षे) यांच्याबरोबर राहत होती. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. त्यानंतर कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केदारच्या विरोधात पोलिसांनी विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कीर्ती व केदार यांच्यामध्ये समेट घडवून आणून पुन्हा या दोघांचा संसार सुरु झाला. मात्र संसार सुरु झाला तरी केदार व त्याच्या सासरच्या माणसांनी पुन्हा पैशासाठी कीर्ती हिला त्रास देण्यास सुरु वात केली. त्यामुळे कीर्ती रोजच्या जाचाला कंटाळली होती. शेवटी तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कीर्ती गंद्रे हिने आपला भावाला फोनवर मी व माझ्या मुलांचे जीवन संपवित असल्याचा मेसेज टाकला. त्यानंतर कीर्ती हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. (प्रतिनिधी)
मुलांची प्रकृ ती स्थिर
कीर्ती केदार गंद्रे (३०) हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. लहानग्या दोन्ही मुलांना जिल्हा
रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृ ती स्थिरअसल्याचे
रु ग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.