शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

अलिबागमध्ये चांगल्या रस्त्यांसाठी खड्डे अ‍ॅक्टिव्हिस्टचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:50 PM

तातडीने दुरुस्ती करा : दर्जाच्या कामाबाबत लवकर बैठक बोलवण्याची मागणी

अलिबाग : तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-पेझारी-नागोठणे आणि अलिबाग-रोहा रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. याविरोधात बुधवारी खड्डे अ‍ॅक्टिव्हिस्टनी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन केले. रस्त्यांची कामे तातडीने कालमर्यादेसह वेळापत्रक देऊन चांगल्या दर्जाची करून घ्यावीत. या प्रश्नाबाबत लवकरात-लवकर एक बैठक आयोजित करावी. त्या बैठकीमध्ये खड्डे अ‍ॅक्टिव्हिस्ट, पत्रकारांना आमंत्रित करून रस्तेबांधणीबाबतचे धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.

दिलीप जोग, मंगेश माळी, धनंजय म्हात्रे आणि अशरफ घट्टे या खड्डे अ‍ॅक्टिव्हिस्टनी मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले. अलिबाग-रेवदंडा-मुरुड रस्त्यावर कुरुळ गावातील विरेन किचन समोर, कुरुळ वळणावर, एपी वाइन्ससमोर, पुढे बेलकडे रोडवर दोन ठिकाणी, नागाव येथील नवीन काँक्र ीट रस्त्यावरील अनेक जॉइन्ट्समध्ये, वंखनाथ मंदिरपासून शास्त्रीनगर ते पालवफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. वरंडेफाटा स्टॉप, तुलाडदेवी स्टॉप चौलनाका या ठिकाणी तर तीन अतिमोठे खड्डे पडले आहेत. बागमळा, ग्रोलस, रेवदंडा हायस्कूल या मार्गावरही खड्डे पडल्याने वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडे, रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या साइडपट्ट्या हरवल्या आहेत. त्यामुळे एखादे वाहन समोरून आल्यावर रस्त्याच्या खाली जावे लागते. त्यामध्ये अपघात झालेले आहेत, तसेच अपघात घडत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

अलिबाग-पेझारी-नागोठणे रस्त्यावरील खड्डेही जीवघेणे झाले आहेत. तेथील खड्डे गेली काही वर्षे त्याच परिस्थितीमध्ये आहेत. रस्त्याची कामे करणारे ठरावीक ठेकेदार आणि आपल्या खात्यातील काही अधिकारी, कर्मचारी संगनमत करून जनतेच्या करातील लाखो रुपयांचा सरळसरळ भ्रष्टाचार करत आहेत. तर दुसरीकडे जनतेला अपघातमय परिस्थितीत निष्काळजीपणे वाºयावर सोडून दिले असल्याचे संबंधित आंदोलकांनी सांगितले.

रस्त्यांच्या कामांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपअभियंता नरेश नाईक यांनी सांगितल्याचे दिलीप जोग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत नरेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.प्रमुख मागण्याच्अलिबाग-वावे-सुडकोली-रोहा रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. एचपी कंपनीपर्यंत रस्त्याचे बºयापैकी काम झाल्याचे दिसून येते. केल्या जाणाºया कामाचा तपशील,क्र ॉस-सेक्शनचे ड्रॉइंग, ठेकेदाराचे नाव, तक्र ार करायची असल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी याबाबतची माहिती दर्शवणारा फलक लावण्यात आलेला नसल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.च्कामावर सुपरवायझर, कनिष्ठ अभियंते असतात; परंतु कामाचे स्वरूप, कामाचा तपशील तेथील जनतेला माहिती होत नसल्यामुळे तेथे वादावाद होत आहे. त्यामुळे सुरू असलेले काम बंद पडण्याच्या घटना घडतात. याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. रेवस रस्त्यावरील अनेक नाले लगतच्या बेकायदा बांधकामांमुळे बंद करण्यात आले आहेत. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.