मर्क्सचा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली, ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:18 AM2018-08-17T02:18:44+5:302018-08-17T02:18:56+5:30
कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
- मधुकर ठाकूर
उरण - कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने प्रकल्प बंद केल्यास या ठिकाणी काम करणाºया सुमारे ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.
उरण-पनवेल येथील एपीएम (मर्क्स) कंपनीत काम करणाºया १४३ कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. केंद्राने लागू केलेले डीपीडी धोरण आणि कामगार काम करीत नसल्याने तेच काम इतर कामगारांकडून जादा मोबदला मोजून कंपनीला करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. डीपीडी धोरणामुळे थेट मालाची वाहतूक होत असल्याने काम कमी झाले आहे, त्यामुळे काम कमी झाल्याचे कारण देत एपीएमने (मर्क्स) उरण प्रकल्पातील ९९ आणि पनवेलमधील ४४ अशा एकूण १४३ कामगारांना कामावरून कमी केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू आहे.
कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी केंद्र, राज्य सरकारचे अनेक मंत्री, कामगार प्रतिनिधी यांच्या कंपनी अधिकाºयांशी भेटीगाठी आणि चर्चा झाल्या. मात्र, चर्चेनंतरही आश्वासनाशिवाय कामगारांच्या हाती काहीएक लागले नाही. त्यानंतर भाजपाचे महेश बालदी आणि सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. यात उरण येथे कंपनीच्या बसची तोडफोड करीत कर्मचारी आणि अधिकाºयांना मारहाण करण्यात आली. दुसºयांदा घडलेल्या या घटनेचा कंपनी व्यवस्थापनाने निषेध केला. इतक्यावर न थांबता बहुराष्ट्रीय एपीएम (मर्क्स) कंपनीने या घटनेची केंद्र सरकार, राज्य सरकार, दूतावास आणि मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. चर्चेत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे शक्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. त्याशिवाय कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने यापुढे दहशतीत कंपनीचे कामकाज चालविणे अवघड झाल्याचेही व्यवस्थापनाने निदर्शनास आणून दिले.
कामगारांची दिशाभूल
कंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत भूमिका स्पष्ट केली असतानाही स्थानिक राजकीय पुढाºयांकडून कामगारांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना आंदोलन, मारहाण करण्यास उकसवण्यात येत आहे. वारंवार घडणाºया हल्ल्यांमुळे उरणमधील तीनही कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने तीनही प्रकल्प बंद केल्यास सुमारे ९०० स्थानिक कामगारांत कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.