पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:57 AM2018-10-05T04:57:51+5:302018-10-05T04:58:05+5:30

हस्तांतर अधांतरीच : लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठ व पेट्रोकेमिकल संस्था

Movement of employees of petrochemical organization | पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next

गिरीश गोरेगावकर

माणगाव : कोकणातील अग्रगण्य रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटु) एक भाग असणाºया पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग संस्थेचे प्रत्यक्ष हस्तांतरण गेली चौदा वर्षे रखडले आहे. त्यामुळे या संस्थेवर नियंत्रण तंत्रशिक्षण संचालनालयाचे की विद्यापीठाचे हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. याविरोधात संस्थेच्या कर्मचाºयांनी बुधवार, ३ आॅक्टोबर पासून आंदोलन सुरू केले आहे.

संस्थेतील ४१ शिक्षकेतर कर्मचाºयांनी विद्यापीठाकडून अपेक्षित सेवा न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ११ मे १९९२ च्या शासननिर्णयानुसार जागतिक बँक प्रकल्पांतर्गत पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापन, मालमत्ता, दायित्व व जबाबदाºयांसह ही संस्था विद्यापीठाकडे वर्ग करण्यात यावी असा आदेश देण्यात आला. त्यानुसार पेट्रोकेमिकल संस्था २00४ मधील करारानुसार विद्यापीठात विलीन झाली आहे. मात्र अद्यापही या संस्थेवर तंत्रशिक्षण संचालकांचे नियंत्रण आहे. यावर कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही, असा आरोप कर्मचाºयांनी केला.
शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय व राज्य सरकार यांच्या अनास्थेमुळे हा प्रश्न चौदा वर्षे रखडला आहे.

पदविका कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी मंत्रालयात वारंवार चौकशी करतो. विद्यापीठाकडून प्रक्रि या पूर्ण झाली असून मंत्रालयात हे प्रकरण प्रलंबित आहे.
- प्रा. विलास गायकर, कुलगुरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात इन्स्टिट्यूट आॅफ पेट्रोलियम इंजिनियरिंगच्या समावेशाबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. या प्रश्नाबाबत कर्मचाºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
- अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे, आमदार,
भाजपा, कोकण पदवीधर मतदारसंघ
विद्यापीठ आणि शासनाच्या वतीने तंत्रशिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसार मंजूर पदे विद्यापीठात वर्ग झाल्याचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा.
- अनिल कुंभार, अध्यक्ष, कर्मचारी संघटना

कर्मचारी आंदोलनाची रूपरेषा
3 ते १२ आॅक्टोबर काळ्या फिती लावून आंदोलन
१५ ते १९ आॅक्टोबर लेखणी बंद आंदोलन
२0 आॅक्टोबर
एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
२२ आॅक्टोबर दिवसरात्र बेमुदत साखळी उपोषण.

सावत्रपणाची वागणूक
च्डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा भाग म्हणून सन १९८१ मध्ये कोकणातील लोणेरे येथे रायगड पॉलिटेक्निक संस्था स्थापन करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला. सन १९८२ मध्ये लोणेरेत प्रत्यक्ष केमिकल अभियांत्रिकी डिप्लोमा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
च्डॉ. आंबेडकर विद्यापीठाची स्थापना सन १९८९ मधील कायद्यान्वये करण्यात आली. त्यानंतर मे १९९२ मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार रायगड पॉलिटेक्निक हे इन्स्टिट्यूट आॅफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग (आयओपीई) मध्ये रूपांतरित करण्यात आले.
च्तसेच या संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते; मात्र अद्यापही विद्यापीठ या संस्थेतील कर्मचाºयांना सावत्रपणाची वागणूक देत आहे.

शैक्षणिक बाबींचा लाभ पदविका विभागातील शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळत नाही
च्कागदोपत्री विलीनीकरण झालेले असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पदविका अभ्याक्रमातील शिक्षकेतर कर्मचाºयांनी केला. पदविका आणि पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्याक्र मासाठी दोन इमारती अस्तित्वात आहेत. मात्र संस्थेचे विलीनीकरण झालेले असताना पदविका व पदवी विभागा अंतर्गत परस्पर बदल्या, पदभरती, टेक्विपनुसार प्रशिक्षण अशा शैक्षणिक बाबींचा लाभ पदविका विभागातील शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळत नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तंत्रशिक्षण विभागातील सुप्रिया घोटाळे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
 

Web Title: Movement of employees of petrochemical organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड