शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:55 AM

मंत्रालयावर एकजुटीने धडक दिली की, सरकार सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवण्यास तत्पर असते असाच समज सबंध महाराष्ट्रातील जनतेने करून घेतला आहे.

अलिबाग : मंत्रालयावर एकजुटीने धडक दिली की, सरकार सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवण्यास तत्पर असते असाच समज सबंध महाराष्ट्रातील जनतेने करून घेतला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार, दबलेले, पिचलेले असे सर्वच घटक मंत्रालयावर धडक देताना दिसून येतात. राज्यातील शेतकºयांचे विविध प्रश्न तडीस लावण्यासाठी आता राज्यस्तरावरील बळीराजा शेतकरी संघ मैदानात उतरला आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास ३० एप्रिल रोजी लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक देऊन जेल भरो आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.जेलभरो आंदोलन छेडण्यासाठी राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकºयांची मोट बांधली जात असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हाध्यक्ष संजय पाशिलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या होत असलेल्या आत्महत्येबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकºयांना अभिवादन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने शेतकरी अन्नत्याग आंदोलनात सामील झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. अन्नत्याग आंदोलन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हाध्यक्ष संजय पाशिलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महाराष्ट्र राज्यामध्ये अन्नाचा पोशिंदा असलेला शेतकरी संकटात सापडला आहे. इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकºयांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. असे असताना सरकारने केवळ पोकळ आश्वासने देऊन शेतकºयांची चेष्टा केली आहे. बळीराजा पेटून उठला तर, सरकारला फार कठीण पडेल असा इशारा संघटनेने दिला आहे. राज्यामध्ये शेतकºयांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच धर्मापाटील यांच्यासारख्या शेतकºयाला मंत्रालयात येऊन आत्महत्या करावी लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे.ज्या-ज्या शेतकºयांनी न्यायासाठी सरकारकडे हात पसरले, परंतु त्यांच्या हातात काहीच पडले नाही त्यांना आत्महत्या करावी लागली आहे. त्यांना अभिवादन करणे हा अन्नत्याग आंदोलनाचा भाग आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघाने अन्नत्याग आंदोलन छेडले असल्याचे पाशिलकर यांनी स्पष्ट केले.जगाची भूक भागविणाºया शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचा एकही अधिकारी दुपारपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नसल्याचे आंदोलक शेतकºयांनी सांगितले. सरकारने आतापर्यंत शेतकºयांना केवळ आश्वासनेच दिली आहेत. त्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे सरकार आणखी किती धर्मा पाटील यांचे बळी घेणार असा संतप्त सवाल पाशिलकर यांनी उपस्थित केला. मंत्रालय हे देवालय नाही तर, आत्महत्येचे केंद्र बनत चालले आहे. त्यामुळेच आता शेतकºयांचा अंत पाहू नका.शेतकºयांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आर्त हाक संघटनेने सरकारला जिल्हा प्रशासनामार्फत दिली आहे.शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्याशेतकºयांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस निर्णय, शेतीमालाला योग्य हमीभाव, शेतीकर्ज अद्यापपर्यंत माफ केलेले नाही सर्वप्रथम ते माफ करावे, कृषी पंपासाठी लागणारी वीज मोफत असावी अशा विविध प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी