भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:49 AM2018-12-07T00:49:30+5:302018-12-07T00:49:36+5:30
रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत;
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत; परंतु अद्यापही शेतकºयांना पुनर्वसनासाठी झगडावे लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्येही हजारो शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातील अतिरिक्त भूसंपादनाचा मोबदला शेतकºयांना मिळावा. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघाचे पेण तालुका अध्यक्ष जनार्दन नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अद्यापही सकारात्मक तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे. उर्वरित शेतकºयांना त्याचा फायदा मिळत नाही, त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सरसकट सर्व प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या जमिनीची मोजणी लावून त्यांना संपादित क्षेत्राचा मोबदला देणे आवश्यक असल्याचे जनार्दन नाईक यांनी सांगितले.
लोकांना भूसंपादनाचा तसेच पुनर्वसनाचा फायदा मिळावा. गडब, आमटेम, कोलटी या गावांतील शेतकºयांनाही न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
>निवडक प्रकल्पग्रस्तांना मोबदला
२००९ पासून पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने शेतकºयांच्या जमिनी, घराचे संपादन केले आहे; परंतु या प्रकल्पबाधित शेतकºयांना योग्य मोबदला दिला गेलेला नाही. अतिरिक्त संपादनात मोडणारी पनवेल ते इंदापूरपर्यंतची बहुतेक गावे येत नाहीत. त्यामधील काही निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे.