हाथरस घटनेतील पीडितेला न्यायासाठी आंदोलन, वाशीत काँग्रेसचे जनजागरण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 01:06 AM2020-11-06T01:06:25+5:302020-11-06T01:07:20+5:30
hathras case : हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही.
नवी मुंबई : हाथरसमधील घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसने जनजागरण अभियान सुरू केले आहे. यानिमित्त वाशीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले होते.
हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही. कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही अडविले होते. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा. सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी काँग्रेसने अभियान सुरू केले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलन केले. या प्रकरणातील दोषींना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला. धरणे आंदोलनास काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, ऐरोली मतदारसंघ प्रभारी अनिकेत म्हात्रे, बेलापूर मतदारसंघ प्रभारी शार्दुल कौशिक, अनिता मानवतकर, शोभा पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.