पनवेल, माणगावमध्ये आंदोलन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:31 PM2019-12-20T22:31:42+5:302019-12-20T22:32:02+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : निषेध फलक झळकावून घोषणाबाजी; हजारो नागरिकांचा सहभाग

The movement is peaceful in Panvel, Mangaon | पनवेल, माणगावमध्ये आंदोलन शांततेत

पनवेल, माणगावमध्ये आंदोलन शांततेत

Next

कळंबोली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मंजूर करून पास करण्यात आला. परंतु कायद्याविरोधाचे देशभरातील वातावरण तापले आहे. शुक्रवारी पनवेल शहरातील मुस्लीम समाजाने कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले. यावेळी पाच हजारांपेक्षा जास्त मुस्लीम बांधव उपस्थित होते.


तळोजात या कायद्याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी पनवेल शहरातील पटेल, कच्छी मोहल्ला, मुस्लीम नाका, भारत नगर येथील मुस्लिमांनी आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या मैदानावर केंद्र्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेगवेगळे फलक झळकवून कायद्याला विरोध केला.


कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून पनवेल शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मुस्लीम बांधवांचा मोर्चा पनवेल महापालिकेजवळ थांबला. त्यामुळे तो तहसील कार्यालयापर्यंत जाऊ शकला नाही. शिष्टमंडळाने जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले. कुठे अप्रिय घटना घडली नाही.


बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे
पनवेल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीजवळ बहुजन क्रांती मोर्चातर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. शहरातील शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करून बहुजन क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केब आणि एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. हा कायदा म्हणजे संविधानाचे उल्लंघन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

केंद्र शासनाने नागरिकत्वाची जी दुरुस्ती केली आहे, ती भारतीयांवर अन्यायकारक आहे. याबाबत अगोदर जनजागृती करणे गरजेचे होते. तसे न करता बहुमताच्या जोरावर हा कायदा पास करण्यात आला. याबाबत लोकांना कोणतीही माहिती नाही. तसेच त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आम्ही आंदोलन केले.
- लतीफ शेख, अध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेस

Web Title: The movement is peaceful in Panvel, Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.