अलिबाग : देशभरात ७१वा स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला जात आहे, असे असताना रायगड जिल्ह्यातील काही आरटीआय कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवला आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे होणार प्रचंड हाल आणि मुद्रांकविक्रेत्यांकडून सुरू असलेली लूट या दोन प्रमुख मुद्द्यांवर जिल्हाधिकार कार्यालयासमोर आंदोलने छेडण्यात आली होती.आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी आणि आरटीआय कार्यकर्ते दिलीप जोग यांचा समावेश होता. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७० वर्षे उलटून गेली, तरी नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे. रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांना रस्त्यावरु न प्रवास करणे मुश्कील झाले आहे. खराब रस्त्यांमुळे रोजच अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका सवर्सामान्यांच्या जीवाला बसत आहे. याबाबत प्रशासनासह लोकप्रतिनीधीही निष्क्र ीय असल्याचे आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवदेनात नमुद केले आहे. जिल्हा रु ग्णालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामध्ये तातडीने सुधारणा करावी, असी मागणी त्यांनी केली.जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा काढण्यात आल्या; परंतु ११ आॅगस्टला निविदा मंजूर होण्यापूर्वीच २८ जुलैपासून संबंधित ठेकेदारांनी खड्डे भरण्यास सुरु वात केली आहे. त्यावर कोणाचेही निरीक्षण नाही. खड्डे भरण्याच्या कामासाठी सुमारे तीन कोटी ५० लाख रु पयांचा निधी खर्च केला जात आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि सर्व नगरपालिकांनी २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत जेवढे रस्ते बांधले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जोग यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. काही मुद्रांकविक्रे ते १०० रु पयांचा स्टँप हा ११० रु पयांना विकत आहेत. ही जनतेची सुरू असलेली लूट थांबवावी, यासाठी तक्र ारी केल्या. मात्र, त्यावर कोणीच कारवाई केली नसल्याचे जोग यांनी म्हटले आहे.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजवंदनाचा कार्यक्र म पार पडतो. त्यामुळे आजच्या दिवशी पालकमंत्री प्रकाश मेहता ध्वजवंदनाला येतील. त्या वेळी आपल्या आंदोलनाची दखल घेतील, अशी भाबडी आशा आंदोलकांना होती. मात्र, पालकमंत्री प्रकाश मेहता यांनीच राष्ट्रीय कार्यक्र माला दांडी मारल्याने त्यांची निराशा झाली.
मुद्रांकविक्रेत्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:29 AM