खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावर, कडक बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:31 AM2022-12-03T06:31:54+5:302022-12-03T06:32:13+5:30
संपूर्ण रायगडावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसन्मानासाठी ‘चलो रायगड’ अशी हाक दिल्याने हजारो शिवभक्त आणि उदयनराजे समर्थक महाडमध्ये दाखल होत आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर खासदार उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
संपूर्ण रायगडावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले आहेत. उदयनराजे भोसले यांनी ‘शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलो असतो, तर बरं झालं असतं,’ अशी भावना व्यक्त केली आहे. सकाळी उदयनराजे हे रायगडावर शिवछत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक होणार आहेत.