पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:49 PM2019-03-17T12:49:07+5:302019-03-17T13:28:32+5:30

एनएमएमटीवर वाहन चालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

MPSC Exam Result Panvel dipali jadhav PSI | पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय 

पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय 

googlenewsNext
ठळक मुद्देएनएमएमटीवर वाहन चालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.दीपाली जाधव एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाल्या आहेत.पनवेल तालुक्यातील पहिलीच महिला या पदावर पोहचल्याने जाधव कुटुंबियांचे आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

वैभव गायकर

पनवेल - एनएमएमटीवर वाहन चालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दीपाली जाधव असे दिलीप जाधव यांच्या मुलीचे नाव असून नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाल्या आहेत.

पनवेल तालुक्यातील पहिलीच महिला या पदावर पोहचल्याने जाधव कुटुंबियांचे आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मार्चमध्ये कोळखे गावातील रहिवासी असलेल्या दीपाली जाधव यांचे प्राथमिक शिक्षण कोळखे गावातील जिल्हा परिषदेच्य शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण हे व्हिके हायस्कुल, ब्रान्स कॉलेज याठिकाणी पूर्ण झाल्यानंतर दीपाली यांनी पुरंदर कॉलेजे लोहगड येथून एम कॉम चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एमपीएससीकडे मोर्चाचे वळवत २०१७ साली परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल २०१९ मार्चमध्ये जाहीर झाल्यानंतर त्यांची  पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. वडील एनएमएमटी चालक असताना त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही. वडील दिलीप जाधव यांना दोन मुले आहेत. दीपाली यांना लहानपणापासून पोलीस सेवेत रुजू करण्याचे स्वप्न त्यांनी इच्छाचशक्तीच्या जोरावर पूर्ण केले आहे. मागील २२ वर्षापासून दिलीप जाधव एनएमएमटी चालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र मुलीच्या यशाबद्दल ते खूप आनंदीत आहेत. मुलीने खऱ्या अर्थाने आमचे स्वप्न पूर्ण केले असून मुलींना कधीही कमी लेखू नका असे ते गर्वाने सांगत आहेत. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील दीपाली जाधव या पहिल्याच पोलीस उपनिरीक्षक असल्याने जाधव कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

मुलीच्या यशाबद्दल विशेषतः आमचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदी पनवेल तालुक्यातील पहिली महिला म्हणून माझ्या मुलीची निवड झाली हे देखील खूप प्रेरणादायी असल्याचे मत एनएमएमटी चालक दिलीप जाधव यांनी सांगितले. 

कुटुंबीयांचा वाटा मोठा 

आपल्या यशाबद्दल दीपाली जाधव यांनी शिक्षण हेच सर्वस्वी आहे. महिलांनी कधीही स्वतःला कमी समजू नये असे म्हटले आहे. तसेच माझ्या यशात कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे . त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज हे यश संपादित केले आहे .भविष्यात काम करताना देशसेवेसाठी जे करावे लागेल ते करेन अशी प्रतिक्रिया दीपाली जाधव यांनी दिली आहे. 

Web Title: MPSC Exam Result Panvel dipali jadhav PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.