शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

चौऱ्याऐंशी गावांची रक्षणकर्ती विन्हेरेची श्री झोलाईमाता

By admin | Published: October 09, 2016 2:52 AM

महाडपासून २२ किमी अंतरावरील विन्हेरे येथील श्रीदेवी झोलाईमातेचा महिमा अगाध आहे. महाडचं आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांची लाडकी

महाड : महाडपासून २२ किमी अंतरावरील विन्हेरे येथील श्रीदेवी झोलाईमातेचा महिमा अगाध आहे. महाडचं आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांची लाडकी बहीण म्हणून श्रीदेवी झोलाईमातेची खरी ओळख आहे. या देवीचा नवरात्रौत्सव परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. संकटकाळात भक्तगणांची रक्षण करणारी चौऱ्याएेंशी गावांची रक्षणकर्ती असा या झोलाईमातेचा लौकिक आहे. नवरात्रौत्सवास नतमस्तक होण्यासाठी पंचक्रोशीतील माहेरवाशीणींसह महाड, पोलादपूर तालुक्यातील असंख्य भक्तगण विन्हेर येथे हजेरी लावतात. झोलाईमातेच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ही झोलाईदेवी नाशिकच्या सप्तशृंग देवीचा अवतार असून, तिचे सप्तशृंगी गडावर शक्तिपीठ असल्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. तसेच हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकीच अर्धे पीठ असून, ती नाथांची जननी आहे. तिनेच नाथांना साबरी विद्या दिली आणि तिथूनच पुढे ती कोलकात्याला गेली व त्या ठिकाणी दक्षिणेची महाकाली (दक्षिणेश्वरी) म्हणून स्थापित झाली. त्यानंतर महाराष्ट्रात दक्षिणेला आली ती कोल्हापूरला आणि काळूबाई म्हणून मांढरगडावर विराजमाण झाली. त्यानंतर पुढे कोकणात दाखल झाली. भराडीदेवी हे तिचं अखेरचं शक्तिपीठ मानलं जाते. ती सर्वांना सांभाळून घेते अशी भक्तगणांची भावना आहे. काळूबाई, झोलाई आणि जननती या तिन्ही देवतांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या ठायी उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा त्रिगुणांचा वास आहे.महाडच्या वीरेश्वर छबिना उत्सवाच्या काळात विन्हेरेच्या श्रीझोलाई देवीचे स्थान असते. छबिन्याच्या दिवशी पंचकोशीतील अनेक ग्रामदेवतांच्या पालख्या लाडक्या वीरेश्वराला भेटीसही येतात. त्या वेळी सर्वांत महत्त्वाचा मान हा झोलाईदेवींचा असतो.