प्रदूषणावर मल्टीपर्रपज बोटचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:56 AM2017-11-30T06:56:49+5:302017-11-30T06:56:57+5:30

जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली असून तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे.

 Multiprogram Boat Remedy on Pollution | प्रदूषणावर मल्टीपर्रपज बोटचा उपाय

प्रदूषणावर मल्टीपर्रपज बोटचा उपाय

Next

उरण : जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली असून तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे. या बोटीचा उपयोग हरित आणि स्वच्छ बंदर ठेवण्यासाठी अर्थात पर्यावरण संवर्धन आणि सागरी वाहतुकीसाठी मोठी मदत होणार असल्याचा दावा जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष निरज बन्सल यांनी केला आहे.
जेएनपीटी बंदरात अनेक वेळा तेल गळतीचे प्रकार होतात. यामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय पर्यावरणालाही बाधा पोहोचत असते. त्याशिवाय दररोज समुद्रातून वाहून येणाºया स्वच्छतेचे ध्येय ध्यानी घेवून व यावर उपाययोजना करण्यासाठी मल्टीपर्रपज युटीलिटी बोटीची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली आहे. एसएचएम शिपकेअर मुंबई कंपनीकडून घेतलेल्या भाड्याच्या बोटीच्या वेगाची क्षमता २० सागरी मैल इतकी आहे, तर बोटीची लांबी साडेबारा मीटर आहे. त्याशिवाय बोटीची १२ प्रवासी आणि ४ कर्मचारी अशी एकूण १६ प्रवासी वाहतुकीची क्षमता आहे. बोटीची बांधणी एफआरपी पद्धतीने केली आहे. बोटीत ४४८ क्षमतेचे दोन इंजिन बसविण्यात आले आहेत.
तेलाचे प्रदूषण रोखणे आणि कचरा साफ करण्यासाठी ५-१० एम - ३ /स्किमरची क्षमता असलेली यंत्रणा या बोटीत बसविण्यात आली आहे. समुद्रात पसरणाºया तेलाचा संग्रह करण्याची प्रणाली या बोटीत बसविण्यात आली असून त्याची क्षमता ५० लिटर ओएसडी इतकी आहे. तसेच या बोटीत समुद्रात वाहून नेणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही बसविण्यात आली आहे. याचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे. त्याशिवाय समुद्रातील बोया आणि त्याचे दिवे तपासणी करण्यासाठी डेकवर बोलार्ड व्यवस्था करणे व सागरी सुरक्षा, पायलटसाठीही बोटीची मदत होणार असल्याची माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी कॅ. क पूर यांनी यावेळी दिली.
चौकट:हरित आणि स्वच्छ बंदर ठेवण्यासाठी व पर्यावरण संवर्धन आणि सागरी वाहतुकीसाठी होणाºया बोटीचे उद्घाटन जेएनपीटी बंदराचे प्रभारी निरज बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. बंदरातील वाढती मालवाहतूक आणि सागरी स्वच्छतेचे ध्येय लक्षात घेता अशा मल्टीपर्रपज युटीलिटी बोटीची जेएनपीटीला नितांत गरज होती.
हरिर पोर्टअंतर्गत विविध उपक्रमांसाठी ही बोट महत्त्वाचे काम करेल असा विश्वास जेएनपीटी अध्यक्ष निरज बन्सल यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

Web Title:  Multiprogram Boat Remedy on Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड